मंगळवार, २९ जून, २०२१

डॉक्टरला बघुनच पेशंट अर्धा बरा होतो

हे वाक्य, किंवा म्हण ऐकली आहे आपण सर्वांनी. मी पण ऐकली हो, आणि त्यात एक छोटीशी परवा भरच पडली. कशी, अहो थांबा? सांगते सांगते.

माझ्या नोकरीमुळे मला हवा तेवढा भरपूर वेळ मुलांबरोबर घालवता आला नाही. खूपच आधी पासून शाळेत फ्रेंच हि भाषा शिकवली गेली आणि त्यासोबत इंग्लिश होतीच सर्वत्र. ह्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे फारच तोकडं ज्ञान मराठी भाषेचं. असो. झालं गेलं गंगेला मिळालं.

गेले काही महिने, जेव्हा ऑन-ऑफ वर्क फ्रॉम होम सुरु आहे माझं मी दररोजचा मराठी पेपर / वर्तमानपत्र घेतेच आणि थोडासा मजा म्हणून मुलांना वाचायचा आग्रह पण करते. त्याशिवाय वेगवेगळ्या सोशल मिडिया वर येणारे मराठी लेख / किस्से / जोक ई. पण वाचायला देतेच. परवा असेच रविवारी थोडा जास्तच वेळ होता मला आणि वेद पण उत्साहानी सुरु झाला. तो ज्या वेगाने मराठी वाचत होता, ज्या पद्धतीने वाचत होता, त्याचे जगावेगळे उच्चार आणि एकंदरीत गोळाबेरीज फारच भन्नाट होती. ताबडतोब माझ्या तोंडून निघून गेलं, तुझे भविष्यातील पेशंट्सना तू फक्त मराठी वाचून दाखव रोज थोडा वेळ, काही वाक्य, बास, सगळे हसून हसून पुरेवाट, अर्धे बरे झालेच म्हणून समजा. कित्ती मज्जा येईल नाही, वा वा, मी आतुरतेने वाट बघते आहे त्या दिवसाची, आमेन, लवकर उजाडू दे बाबा तो दिवस, म्हणजे सगळ्यांसोबत मी पण पोट धरून हसायला तय्यार. 
 
#marathi #reading-marathi #marathi-newspaper #panacea #doctor-remedy #smile #doctors-personality #pronunciation  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...