मंगळवार, २९ जून, २०२१

राणी ते महाराणी

१६ सप्टेंबर २०१८ ह्या दिवसानंतर ते आज पर्यंत ची माझ्या पायांची स्थिती जी आहे, अर्थातच चढत्या क्रमाने त्यात प्रगती आहेच आणि कालचा छोटासा पुन्हा पायाशी निगडीत प्रसंग जो झाला हे सगळे छोटे धक्के आणि सुचक आहेत कदाचित माझ्या साठी.

हे साधे सुधे नाहीत हो सुचक, ते बरंच काही सांगून जात आहेत. बहुतेक ते मला हे सुचवु इच्छित आहेत कि "आयुष्यभर तु राणी सारखी राहिलीस आता महाराणी हो". पुरे ते काम, धावपळ आणि दगदग. आता फक्त देखरेख करायची, काम नीट होत आहेत का नाही हे बघायचं आणि झक्कास मजेत शांतपणे एन्जॉय करायचं. ठरलं तर मग आता, नवीन महाराणी प्रितीचे स्वागत असो. hmmm तर आता मी कुठल्या देशाची महाराणी?, बघा हा पण चॉईस माझाच आहे हो, अहो भाग्य माझं. 
 
#queen #highness #princess #great-rani #senior-queen #queen-of-queens #hints #welcome-queen-preeti



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...