शुक्रवार, २५ जून, २०२१

सुगंधी स्वागत

आज सकाळी नित्यनियमाप्रमाणे जाग आली, सकाळचं थोडंस आटोपल्यावर मी जेथे योग करते ती जागा झाडून घेते. पण आज थोडासा बदल होता कारण झाडू-पोछा मावशी आज बहुतेक येणार नव्हत्या. त्यामुळे म्हटलं जास्त वेळ न दवडता मावशी-स्टाईल झाडावं सगळंच पट्टाकिनी. झाडू ड्राय बाल्कनीत ठेवला असतो मी. त्यामुळे झाडू घेण्यास ड्राय बाल्कनीचं दार उघडल्या उघडल्या चमत्कार झाला, अचानक. व्वा. मी एक वेगळीच अनुभूती घेतली कधी नव्हे ती. असं वाटलं कि खूप सारी सुगंधी फुलं माझं स्वागत करत आहेत, किंबहुना ते थांबले होते कि कधी एकदा मी दार उघडते आणि कधी ते फ्रॅग्रन्सफुल असा मला अनुभव देतात. अहाहा. भन्नाट. अप्रतिमच. काही क्षण तर मी माझी नव्हतेच कारण हे पहिल्यांदाच होत होत माझ्या सोबत. भानावर आल्यावर उमगलं कि काल उशिरा लावली वॉशिंग मशीन पिल्लानी माझ्या काही कारणास्तव त्यामुळे कपडे वाळत घालायला पण उशीर झाला आणि त्यामुळे चढाओढ असल्याप्रमाणे त्या अजूनही ओल्या असलेल्या स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचा तो सुगंध होता. सर्वच कापड्यानी त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे साठवलेला डिटर्जेन्ट चा सुगंध ते माझ्या वर उधळत होते जणू. इतकी वर्ष मी सर्फ एक्सेल वापरते पण त्याचा इतका अप्रतिम सुगंध आहे हे मला आज पहाटे प्रकर्षाने जाणवलं. फारच अभूतपूर्व दिवस सुरु करण्यासाठी त्या वॉशिंग पावडरचे, कपड्यांचे, मुलांचे सगळ्यांचे पोटभर आभार.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...