मंगळवार, २२ जून, २०२१

मी आज मनसोक्त धबधबा अनुभवाला

हो मंडळी, अगदी बरोबर वाचलंत. 

माझ्या दिनचर्येचा हा एक महत्वाचा भाग आहे, हे मोठ्ठ काम असत रोजच माझं, संध्याकाळी कॉर्पोरेशन च पाणी आलं कि वरच्या टाकीत पाणी पंप करणं. गेली कित्येक वर्ष हे न चुकता सुरु आहे पण आज, आज काही वेगळं घडलं. मला त्या पाणी सोडणाऱ्याची वेळ पक्की माहित आहे. बहुतेक अगदी त्याच वेळी मला पंप चालू करायला फार आवडतो कारण मला पाणी आल्याचं कळतं आणि त्या टाकीत पडणाऱ्या आवाजाचा माग घ्यायला मला फा$$$$$$र आवडत, का? मला माहित नाही. आज मी पंप सुरु केला आणि थोड्यावेळाने खालच्या टाकीच झाकण उघडून बघितलं कि किती पाणी चढलंय ह्याचा अंदाज घेण्यासाठी, आणि भन्नाट चमत्कार झाला. फ्रेश ताज्या पाण्याचा मला सुगंध अनुभवता आला. वा वा, इतकं तृप्त झाल्यासारखं वाटलं जसे कि मी अप्रतिम धबधब्याचा अनुभव घेते आहे. मग काय विचारात अनेक वेळा झाकण उघडलं बंद केलं, असं करत बसून राहिले तो सुगंध अनुभवत.

काही दिवसांपासून मला फार वाईट वाटत होत कि मोगरा आणि त्याचा भन्नाट सुगंध आता फक्त पुढल्या वर्षीच अनुभवता येणार, तसेच रोजच्या वर्तमानपत्रात अनेक धबधब्याची छायाचित्रे येतात, पण प्रत्यक्ष सध्या जाता येत नाही, जाऊ नये पण, ई. ह्या सगळ्याची अनुभूती घरबसल्या मला आज अनवधानाने, अचानक पणे मिळाली त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. शतशः धन्यवाद निसर्गाला, निर्मळ पाण्याला, त्याच्या वेगाला, पाणी सोडणाऱ्या काकांना आणि बऱ्याच जणांना ज्यांनी माझ्या अंगणात हि गंगा आणली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...