मंगळवार, २२ जून, २०२१

योग आणि दिनचर्या

माझ्या ऑफिस मधे एक नवविवाहित आहे, काहीच महिन्यापूर्वी तीच लग्न झालाय. मग नोकरीमुळे त्यांनी एक छोटेखानी घर घेतलं भाड्याने पुण्याला आणि राहू लागले. काल आंतरराष्ट्रीय योग दिवस होता, त्यामुळे आमच्या विश्वविद्यालयात ऑनलाईन अनेक वैविध्य कार्यक्रम होते. त्याच अवचित्य साधून हि नवीन लग्न झालेली मॅडम मला विचारते कशी "मॅडम तुम्ही योग करता का हो रोज?" मी काही म्हणायच्या आताच, "नाही तुम्ही करतच असाल पण मला जमतच नाही, पहाटे उठायचा कंटाळा, आणि उठल्यावर मग गडबड सगळी, ८ वाजता बस गाठायची असते, संध्याकाळी योग करण्याचं मन नाही करत, संघ्याकाळी गेल्यावर काय खायला करायचं, रात्री जेवायला काय करायचं, ह्यातच वेळ कसा निघून जातो लक्षातच येत नाही", ई. एका श्वासात.

म्हटलं चला एक नवीन विषय मिळाला मला लिहायला. माझ्या दृष्टीने आणि मला सुचलेले उपाय थोडक्यात येथे मांडते आहे. अर्थात मी तिला पण हे सगळं सुचवणार आहेच, बघूया, होईल बहुतेक बदल हे सगळं ऐकल्यावर, टिप्स हो.

सुरवातीला एक दिवसा आड करायचा योग, ज्या दिवशी योग करायचा त्या दिवशी उसळ करायची, म्हणजे जास्त भाज्या चिराचिरी करण्यात वेळ जात नाही. भाज्या आधीच चिरून ठेवायच्या, किंवा चिरलेल्या विकत आणायच्या, काही तरी प्लॅन किंवा जुगाड केल्याशिवाय सगळं साध्य होणार नाहीच. घरची काम वाटून घ्यायची दोघांनी बरोबरीने. म्हणजे दोघांनाही वेळ मिळतो योग करायला आणि मज्जा येते. दररोज साग्रसंगीतच जेवण करायचं असं कुठे लिहलंय, "वन डिश मिल" पण पुरेसं असतं, रादर ते जास्त पौष्टिक आणि करायला - खायला सोप्प, बदल पण भन्नाट. त्यामुळे योग करण्यासाठी योग जुळवून आणावा लागतो, ते ऑटोमॅटिक होत नाही. आणि मुख्य म्हणजे "पुणे तेथे काय उणे" सगळं उपलब्ध आहे, स्मार्ट पणे मजेत वेगवेगळे प्रयोग करत राहायचं. बास. मग योग जमलाच म्हणून समजा, योग दैनंदिन दिनचर्येचा भाग झालाच म्हणून समजा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...