सोमवार, १९ एप्रिल, २०२१

सासर आणि जर्नल (Journal)

अचंबित झाला ना हे वाचून किंबहुना हे मॅपिंग बघून. hmmm, सांगते काय गम्मत आहे ते. 

मी आज पर्यंत अनेक वर्कशॉप्स आयोजित केले आहे, आणि अनेक जणांना मार्गदर्शन केले आहे ठराविक पद्धतीचे आर्टिकल्स / पेपर्स कसे लिहायचे ते. त्यात मी अगदी पोटतिडकीने सगळ्यांना विनंती करते कि सर्वप्रथम ज्या जर्नल मधे आपल्याला हे आर्टिकल्स / पेपर पाठवायचा आहे ते शोधा, मग त्यात (म्हणजे त्या जर्नल मध्ये हो) आधीच असा पेपर लिहिला आहे का ते बघा, असेल तर:

  • तो कसा लिहिला आहे, 
  • कधी लिहिला आहे आणि 
  • काय काय त्यात नमूद केलं आहे ते सर्व नीट बघा आणि मग ठरवा कि ह्याच जर्नल मधे पेपर टाकायचा का ते? 

जर उत्तर "हो" असेल तर त्या जर्नल मधे आधी प्रसिद्ध केलेल्या पेपर पेक्षा वेगळी मनुस्क्रिप्ट उभी करावी लागेल, अँप्रोच देखील बदलावा लागेल ई. म्हणजे एक वेगळा पेपर तय्यार होईल वाचकाला उपयोगी असा आणि तो कदाचित एडिटर ला पण आवडेल. 

जर उत्तर "नाही" असेल, तर मग नवीन जर्नल शोधणं आलं, आणि हि सगळी प्रक्रिया पुन्हा करावी लागणार जोवर एकदम हवं तस्स जर्नल मिळत नाही तो वर. एकदा ठरलं कि मग पेपर लिहायला घ्यायचा त्या नुसार, त्या जर्नल च्या गरजेनुसार.

हे सगळं सांगितल्यावर जरा प्रेक्षकांचे चेहेरे बघण्यासारखे होतात. कारण सोप्प आहे. सर्वसाधारण आधी पेपर लिहिला जातो आणि मग जर्नल शोधण्यासाठी वणवण केली जाते. मी जरा उलट सांगते ना म्हणून.....

मग थोडंस वातावरण हलकं करण्यासाठी मी हे उदाहरण देतेच, ते असे :

जर्नल शोधणं म्हणजे लग्नाआधी सासरला अनेकदा जाऊन येणासारखं आहे, चाचपडणं आहे, आढावा घेणं आहे.....

हे वाक्य संपायच्या आधीच सगळ्यांच्या चेहेऱ्यावर जे खळखळून हसू फुटत म्हणून सांगते, हो हो, मुलींच्या जास्त, कारण... जाऊ दे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...