गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

ह्या जगा पल्याड ...

अश्या काही गोष्टी नक्कीच आहेत ज्या ह्या जगा पल्याड आहेत माझ्यासाठी. मी बराच वेळ घालवला हे शोधण्यासाठी कि ह्याचा शोधक कोण आहेत ते, पण नाही सापडलं. असो.

मी कशा बद्दल बोलते आहे, "मुळ्याची कोशिंबीर", नेहेमीच्या ब्राह्मणी कोशिंबिरी पेक्षा वेगळी / हटके, कारणे दोन माझ्या दृष्टीने. एक म्हणजे ह्यात मी / माझी आई दाण्याचे कूट घालत नाही आणि दुसरे म्हणजे हि किसून करतात, नाही तर बाकीच्या चोचून / छोटेसे तुकडे करून केल्या जातात. अतिशय भन्नाट स्वभाव आहे ह्या कोशिंबिरीचा, पानातल्या प्रत्येक पदार्थाची चव वृद्धिंगत करते, जबरदस्त च अशी. जेवणाची मज्जा काय असते ते मला विचार जेव्हा मुळ्याची कोशिंबीर पानात वाढली असते. अहाहा. आजच्या कोशिंबिरीसाठी वापरण्यात आलेले मुळे इतके चविष्ट होते, कि ज्याचं नाव ते, अर्थातच दही  फोडणी मीठ साखर मिरची मोहोरी ई. चे साग्रसंगीत असलं जमलं होत ना कि अगदी मनापासून म्हटलं गेलंच "सर्वच अन्नदाता सुखी भव ।।" शेतकरी, शेतजमीन, पाऊस, एकंदरीत आजूबाजूचं वातावरण, भाजीवाला, हे, आणि अगणित अदृश्य सगळे.    

अगदी अशीच अवस्था असते माझी जेव्हा मी लाल भोपळ्याचं भरीत एन्जॉय करते, मिरचीचं लोणचं, दडपे पोहे, मसाले भात, गोळा भात, वडा भात आणि हि यादी अशी आहे माझ्या आवडीच्या पदार्थांची....

एक वेगळीच एनर्जी मिळते बावा हे सगळं केल्यावर / खिलवल्यावर.

अगदी ताबडतोब लिहायचं ठरवलंच, लिहिलं आणि असेच मला भावणारे छोटे छोटे पदार्थ करत राहते म्हणजे अनेक दिवस मज्जेत जातील आणि बऱ्याच आठवणी गोळा होतील. 

असं अनेकदा आपण अनुभवतो कि समोरचा माणूस खुशीत तुम्हाला म्हणतो "तुझ्या तोंडात तूप-साखर, किंवा दही-साखर" ई. मी पण म्हणत असे / म्हणते अनेकदा अनेकांना. मग काही जण वेगळं रिऍक्ट होऊ लागले, इतकं गोड नको वगैरे, मग मी हे वाक्य बदललं आणि "तुझ्या तोंडात बाखरवाडी / चकली...." ई. वर आले. पण हा छोटेखानी लेख लिहिल्यावर मला असं आवाहन करावंस वाटतंय सगळ्यांना कि माझ्या साठी ह्या पुढे असं म्हणा "तुझ्या ताटात मुळ्याची कोशिंबीर...".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...