तुळशीबाग... हा शब्द वाचल्या वाचल्या काय काय आलं डोळ्यासमोर मित्र मैत्रिणींनो...
बरोबर, चितळे - भन्नाट शॉपिंग - कावरे आईसक्रिम...
ती गर्दी, ती व्हरायटी, ती किंमत आणि ती मज्जा...
अगदी बरोबर
पण आज मी त्या माझ्या देखील आवडत्या तुळशीबागेबद्दल बोलतच नाही आहे.
हो अगदी बरोबर वाचता आहात मंडळी तुम्ही.
तर त्याच असं झालं, ऐका...
१) मला माझ्या फिसिओथेरपीस्ट मैत्रिणीने सांगितल्या प्रमाणे आणि माझ्या पायांच्या वेल बेईन्ग करता सकाळचं चालणं फायद्याचं आहे.
२) आमच्या घरासमोरचा रस्ता अगदी लोण्यासारखा गुळगुळीत झाला आहे एवढ्यातच. त्यामुळे मी आजकाल शुद्ध हवा सेवन रोज करतेच.
आता फिरताफिरता पहिल्यांदा मी बदल म्हणून आमच्या गल्लीच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेले, आणि जाते रोज आजकाल. डाव्या बाजूला एक छोटेखानी स्वतंत्र बंगला आहे. त्या घरमालकाने त्यांच्या घरासमोर तर फुलांच्या आणि झाडांच्या वैविध्य प्रकारच्या कुंड्या ठेवल्या आहेतच पण त्यांच्या घरासमोर एक मोठा प्लॉट रिकामा आहे. त्याचा सदुपयोग त्यांनी करून घेतला आहे आणि अत्यंत सुबक पद्धतीने आणि विचारपूर्वक वैविध्य रंगांच्या फुलांच्या कुंड्या मांडल्या आहेत. फार छान आणि वेगळेपण जाणवलं मला पट्टाकिनी. त्या कुंड्याच फक्त मी पहिल्या दिवशी बघितल्या. पण आज मी अवाक झाले एक गोष्ट बघून. त्याच घरमालकांनी पुढच्या मोकळ्या प्लॉटवर असंख्य तुळशीची झाडे लावली आहेत आणि ती इतकी बहरली आहेत, ज्याचं नाव ते. भन्नाटच. आरोग्याला चांगलं आणि दिसायला उत्तम. ते बघून मला तुळशीबाग आठवली. ओरिजिनल तुळशीबाग ह्या भागात देखील अशीच भरपूर तुळस होती म्हणे, आणि आता. हरकत नाही.
बहरलेल्या तुळशीचे दर्शन हे एक चांगलं निमित्य मिळालं आहे आता मला.
आपलं घर आणि आंगण तर कोणीही सजवत पण रस्त्यापल्याड जाण हे कौतुकास्पद आहे, म्हणून हा लेख प्रपंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा