गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

"आली कुठुनशी कानी..." आदित्य रानडे

आज हा जगप्रसिद्ध अभंग, ज्याची मी आभाळाएवढी फॅन आहे, तो ओरिजिनल सिंगर च्या आवाजात ऐकला आज पुन्हा एकदा बरेच वर्षानंतर. 

माझ्या सासऱ्यांना अगदी पहाटे पासूनच आकाशवाणी लावायला आणि ऐकायला फारच आवडतं. त्यात "भुले बिसरे गीत", बातम्या आणि त्यानंतर भक्ती गीते असतात. त्यात आज हा अभंग होता. 

ओरिजिनल सिंगर ला सहर्ष आदर प्रणाम कारण अगदी लहानपणी पासून त्यांच्याच आवाजात ऐकलं आहे हे, पण जेव्हा पासून आदित्यने म्हटलेलं ऐकलं आहे तेव्हा पासून मी 

१. आदित्यच्या आवाजाच्या आणि सादरीकरणाच्या प्रेमातच पडली आहे (ह्याच्या आधी सुद्धा मी लिहलंय त्याच्या बद्दल) आणि 

२. आता फक्त आदित्यच्याच स्वरात हा अभंग मला गोड वाटतोय. 

ओरिजिनल सिंगर ची मनापासून माफी आणि प्ररामानंद होतो आदित्यचं हे काही मिनिटांचं सादरीकरण ऐकून, सगळे टेन्शन गायब, सकाळची सुरवात जर ह्याच्या अभंगाने झाली तर दिवसभर कुणाची बिशाद कि टेन्शन येईल ते... मनापासून आशीर्वाद आदित्य ला आणि असाच नेहेमी गात राहा, ऐकवत राहा, इतका जगावेगळा गुरु लाभलाय त्याला मग असा रिझल्ट मिळणारच ना. 

Listen to this story on : https://youtu.be/qD6TaE1kx2s

On Twitter :https://twitter.com/DrPreetiMulay

Also find me on Facebook.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...