तर त्याच असं झालं कि माझी पिल्लं अगदी छोटी होती तेव्हा पासून नेहेमीच्या पद्धतीने आई बाबा / आजी आजोबा आणि इतर सगळे लहान मुलांचे लाड करतो, लाड करतो म्हणजे पापा घेतो, खेळतो, तसेच मी देखील करायची आणि ते बघून धडपडत येऊन रांगत, पकडून उभं राहून, चालत आणि नंतर धावत येऊन माझ्या वर किती$$$$ प्रेम आहे त्यांचं हे दाखवलं जायचंच अगदी दोघांची कॉम्पिटिशन असल्यासारखं, देवा. कधी असंच काही कारण नसताना, कधी आवडता पदार्थ मिळाला कि, कधी गिफ्ट मिळालं कि आणि असे अनेक प्रसंग असतं.... काय होते ते दिवस अहाहा.
मग न कळत मी म्हणायचे "बास आता, लागेल तुम्हाला... ई. आणि डायबिटीज....". डायबिटीज म्हणजे पुरे आता एवढं गोड नक्को, लाड नको अश्या अर्थाने. हा शब्द प्रयोग मी अनेक वर्ष केला कदाचित अनेक प्रसंगी. कित्ती गोड / कित्ती लाड = डायबिटीज.
मग थोडा काळ मधे गेला, मुलं थोडीशी मोठी झाली आणि एक दिवस ह्यांना एक फोन आला आणि हे बोलतांना जराशे घाबरलेले / काळजीत दिसले. फोन झाल्यावर मी साहजिकच विचारलं काय झालं ते, आणि माझी पिल्लं पण होतीच माझ्या आजूबाजूला तेव्हा. हे म्हणाले ह्यांच्या मोठया भावाला डायबिटीज डिटेक्ट झाला. मला पण अर्थातच काळजी वाटू लागली पण न कळत माझी दोन्ही पिल्लं म्हणतात कशी आम्हा दोघांना, "आम्हाला माहित आहे डायबिटीज म्हणजे काय ते..." ओह, आम्ही दोघेही अगदी चाट पडलो त्या दोघांची ती एकत्र रिऍक्शन बघून / ऐकून. कारण त्यांच्या शब्दकोशात डायबिटीज म्हणजे फारच गोड लाड करणं आणि त्यांनतर माझ्या कडून हा शब्द ऐकणे एवढेच होते तेव्हा, हाऊ इनोसंट.
Please listen to this story, click on this link of YouTube: https://youtu.be/8-8effMXb2Y
On Twitter too: https://twitter.com/DrPreetiMulay
And also on Facebook.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा