आमच्या एक ओळखीचे कुटुंब आहे. गेले अनेक वर्ष आम्ही त्यांना ओळखतो. अर्थात त्यांच्या घरी एक्साक्टली आणि प्रिसाईजली काय होत हे मला माहित नाही ह्या फक्त ऐकीव गोष्टी आहेत पण फारच इंटरेस्टिंग. म्हणून म्हटलं मांडावे येथे.
त्यांच्या घरी नेहेमीप्रमाणे कुटुंब प्रमुख, मुलं, मुलांची आई आणि आजी-आजोबा पण आहेत. कुटुंब प्रमुखा शिवाय जर अजून कोणी टेलिव्हिजन लावला रे लावला कि नियमांची मोठी यादी सांगणं सुरु होते.
- नियम क्रमांक एक: एकदा बघितलेला पिक्चर पुन्हा लावायचा नाहीच.
- नियम क्रमांक दोन: अगदी शांत पणे कुठलाही कार्यक्रम बघायचा, बडबड करायची नाही, हसायचं तर मुळीच नाही
- नियम क्रमांक तीन: फालतूचे कार्यक्रम बघायचे नाहीत जसे कि रिऍलिटी शो, नवीन फिल्म्स, मराठी सिरीयल ई. (यादी फार मोठी आहे, येथे देणं शक्यच नाही) नियम क्रमांक चार आणि असे अनेक (यादी फार मोठी आहे, येथे देणं शक्यच नाही).
असले कंडिशनल नियम ऐकूनच मी दमले. बापरे.
पण तेच कुटूंबप्रमुख आणि घरचे जेष्ठ नागरिक यांनी एकच एक सतत तोच तोच पिक्चर बघितला मोठ्या आवाजात बोलत, हसत तर चालतो कारण जुन्या पिक्चर ची सर नवीन ला नाही म्हणे आणि मग जेष्ठानी करायचं काय? त्यांना आवड आहे म्हणून ते बघतात सगळं, सकाळी जो टीव्ही सुरु होतो तो अपरात्रीच बंद होतो.
मग मी प्रयत्न केला सांत्वन करण्याचा मुलांचा आणि मुलाच्या आईचा, आणि त्यांना हेच सांगितलं कि "सध्या मुलांचं अभ्यासाचं वय आहे, त्यांच्या आईने काहीतरी करून दाखवणं आवश्यक आहे, त्यामुळे हे सगळे नियम तुम्हाला आहेत. टेक इट इझी, चिल, कधीतरी वाटलं तर एखादा कार्यक्रम ऑनलाईन बघा नाहीतर चक्क गप्पा मारा, व्यायाम करा, लिहा, सकाळ संघ्याकाळ पाय मोकळे करा, पत्ते आणि अनेक बोर्ड गेम खेळा. टीव्ही ला अनेक पर्याय आहेत." माझे शब्द आणि पर्याय त्यांना आवडले आणि मला नियम ह्याची परिभाषा नव्याने उमगली.
२०२१ मधे देखील शिकल्या सवरलेल्या घरात हे दृश्य माझ्या अंगावर काटे आणणार आहे. असो.
१५ दिवसांनी, १ महिन्याने पुन्हा आढावा घेतला तर सगळं शांततेत सुरु असल्याचं आढळलं मला. हाश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा