तर हि काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, ज्या वेळी सगळं सुरळीत चाललं होत. नेहेमी प्रमाणे आमच्या केर-फरशीच्या मावशी आल्या सकाळी सकाळी ठरलेल्या वेळेला. त्या जरा चिकित्सक वृत्तीच्या आहेत हे मला माहित होत पण जाणवलं नव्हतं. तर नेमक्या त्या येतात तेव्हाच आमचा चहाचा कार्यक्रम चालू असतो कारण त्याच वेळी अख्ख कुटुंब साखर झोपेतून छान उठलं असतं, कोणी सकाळचा वॉक करून आलं असतं वगैरे.
असो.
मी आमच्या बरोबरीने मावशींना देखील चहा करतेच. त्या दिवशीही केला. आणि त्या कचरा अंगणात ठेवण्यासाठी थांबतात, म्हणतात "ताई$$$$$, चहा पत्ती टाका म्हणजे मी कचरा नेऊन ठेवते.... ई.". सगळ्यांनाच जवळपास गॅस वरून उतरलेला चहा ताबडतोब लागतो त्यामुळे त्या दिवशी काय झालं कि मी चहा पत्ती, चहा केलेलं भांड ई. सगळं ओट्या वरच ठेवलं, म्हटलं टाकुयात थोड्या वेळात आणि आधी सगळ्यांना चहा देऊन आले, मावशींना पण ठेवला, नाहीतर रोज कोणीना कोणीतरी घुटमळत असतंच आजूबाजूला ते चहा देतात आणि मी वापरलेली पत्ती कचऱ्यात टाकते ताबडतोब.
नेमका त्याच दिवशी डब्यातला चहा देखील संपला होता म्हणून तो हि आठवणीने काढण्याकरता डब्बा उघडाच ओट्यावर ठेवला होता.
मी चहा प्यायला टेकले ना टेकले तर चिकित्सक मावशी विचारतात कश्या "ताई$$$$, चहापत्ती टाकायची (राहिली) आहे का?" आणि चहा पिण्याच्या नादात मला ऐकू आलं "ताई$$$$, चहापत्ती काढायची आहे का?". मला गदगदल ना अगदी, म्हंटल "एकतर ह्यांचं लक्ष बघा किती ते माझ्या स्वयंपाक घरात आणि दुसरं म्हणजे कित्ती काळजी त्यांना कि मला चहा रिफील करायचा आहे डब्यात तो...." सहीच ना.
टोटल गोंधळ झालेला लक्षात आल्यावर दोघीही पोटभर हसलो सकाळी सकाळी. देवा.
एक तर त्यांच्या बोलण्यात नाहीतर माझ्या ऐकण्यात चूक आहेच. जाऊ दे, एकंदरीत मज्जा आली आणि जाणवलं ह्या माझ्या चिकित्सक मावशीं बद्दल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा