मागल्या शनिवारी ह्यांना अचानक उठता बसता येईना. आम्ही सगळे थोडेसे घाबरलोच. रविवारी ते जास्तच झालं. मग मी माझ्याशी संपर्कात असणाऱ्या अनेक डॉक्टरांना विचारलं कि तात्पुरतं काही करता येईल का आणि दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट पण घेतली ताबडतोब. मला समजलं / उमगलं त्याप्रमाणे ह्यांना फिसिओ थेरपी ची आवश्यकता होतीच, गोळ्यां व्यतिरिक्त. म्हणून माझ्या अगदी जवळच्या आणि ज्यांनी मला उभं केलं आहे (शारीरिक आणि मानसिक) आधार देऊन त्यांना विनंती केली घरी येण्यासाठी सोमवारी. आणि त्या ताबडतोब तय्यार झाल्या. सोमवार हा माझा "वर्क फ्रॉम होम" चा दिवस होता, पाठोपाठ ४ लेक्चर होते. डॉ. लीना आधी १०.३० च्या दरम्यान येते म्हणाल्या पण नंतर एक वाजता ठरलं भेटायचं. माझे लेक्चर, मुलांची शेवटची बोर्डाची परीक्षा, त्यांना उशीर होणार होता म्हणून डब्बा, आणि डॉ. घरी येणार म्हटल्यावर मी भराभर सगळं घर आवरलं, थोडं वेगळं आणि वेलकमिंग दिसेल ह्याची काळजी घेतली, पन्ह करून ठेवलं, त्याबरोबर माठातलं गार पाणी देखील आणून ठेवलं आणि हे सगळं मी खूप खूप दिवसांनंतर किंबहुना खूप महिन्यात / वर्षात केलंच नव्हतं कारण ह्या "नवीन" दिवसात बाहेरच्यांच येणं -जाणं अगदीच कमी झालं आहे. पण मला जे प्रचंड भारी वाटलं म्हणून सांगते, कि ज्याचं नाव ते. म्हणजे घरानी पण थँक्यू म्हटलं जसं. काहीतरी संचारलं होत त्या दिवशी माझ्यात, अगदी सगळं म्हणजे सगळं आवरलं विजेच्या वेगाने. मज्जा आली. अर्थात ह्यांनाच बरं वाटायला लागलं आणि डॉ. चे क्लिनिक फारच जवळ असल्यामुळे हे म्हणाले मीच जातो, उगाच कशाला त्यांना त्रास. त्यामुळे माझा थोडा हिरमोड झालाच, आणि डॉ. ची प्रत्यक्ष भेट पण नाही झाली, गप्पा राहून गेल्या पण असो. त्या निमित्याने एक वेगळा अनुभव अनेक दिवसांनी चाखता आला. तसेही माझ्या आईच्या घरी मला हि पदवीच दिली होती सगळ्यांनी "आवरासावर मंत्री... " ते आज जगले मी पुन्हा एकदा. आणि हे मी नेहेमीच करत राहील पाहिजे हे माझ्या मनाशी निश्चित केलं ताबडतोब.
To listen to this story, please click here: https://youtu.be/If-F7LOqWKk
Twitter link : https://twitter.com/DrPreetiMulay
Also on Facebook.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा