अनेक वर्ष सातत्याने मी हे माझ्या पिल्लांबरोबर अनुभवते आहे, म्हटलं चला लिहुयात, कारण आज हि पुन्हा तसंच झालं.
मी सगळं जेवण आणून ठेवलं टेबलावर / dinning table आणि आली मंडळी जेवायला.
वेद ला एक सवय आहे,
"आज काय आहे जेवायला?" म्हणून आधी सगळं उघडून बघायचं, ताबडतोब म्हणतो कसा "आमटी तू केली आहेस ना? बघितलं कि सांगितलं मी".
अगदी लहान होती माझी पिल्ल आणि मला शनिवार / रविवार / सुट्टी च्या दिवशी जमेल तशी मी दुपारची किंवा जशी पडतील तशी भांडी घासून ठेवायची सवय होती, तेवढीच मावशींना मदत. माझी पिल्ल (खरंच लहान होती तेव्हा) स्वयंपाक घरात आली आणि त्यांनी बघितली कि सांगायची, हि भांडी तू घासलीस ना? फक्त ती बघून म्हणायचे दोघे. पानात वाढलेली पोळी बघितली कि तू केली ना? चव ना घेता, मला भांडी घासताना किंवा स्वयंपाक करतांना न बघता कसे ओळखतात, महद आश्चर्य. भांडी तर ठिक आहे, कारण माझी घासलेली भांडी ठेवायची पद्धत वेगळी आहे, पण पदार्थ फक्त बघून सांगणं हे जरा नवल आहे माझ्या साठी नेहेमीच.
पण येस, ह्या छोट्याश्या अनपेक्षित वाक्याने १० हत्तीचं बळ मिळत मला. बास अजून काय हवंय.
Listen to this story in my voice: https://youtu.be/VQLXeP1vQWs
Also find me on Facebook and Twitter dears: https://twitter.com/DrPreetiMulay
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा