गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

अनोखा धन्यवाद

आज नेहेमीप्रमाणे आरोळी ठोकून, कपडे गोळा करून, सरतेशेवटी कपड्यांची मशीन लावली. आज काय महद आश्चर्य पण कपडे थोडे कमी होते. नाहीतर माझे "हे" मला नेहेमी म्हणतात "अगं पुरे पुरे, ओव्हर लोड करू नको त्या वॉशिंग मशीन ला" आणि त्यावर माझं नेहेमीच फंडू उत्तर ठरलेलं असतं ते म्हणजे आणि अर्थातच ते वैज्ञानिक पण आहे माझ्या दृष्टीने "एकदा का पाणी पडणं सुरु झालं, कपडे ओले झाले कि आपोआप जागा होते मशीन मधे". असो. 

रोजचाच / नेहेमीचाच संवाद आहे आमचा तो, दोघेही एन्जॉय करतो आणि दोघेही म्हणायचं काही थांबवत नाहीच. 

पण आज मला मनापासून जाणवलं कि तीच मशीन मला धन्यवाद देत आहे कारण? अहो कपडे थोडे कमी होते ना, तरीही मी एक चादर आणि खोळ पण घुसवली, तरीही जागा शिल्लक. त्यामुळे "तिला" (आणि बहुतेक "ह्यांना" देखील) जरा वेगळं आणि हलकंफुलकं वाटत होत म्हणे. 

सहीच ना. 

असे माझे सजीव आणि निर्जीव घटकांशी सतत संवाद चालूच असतात, कारण माझ्यासाठी सगळेच सजीव आहेतच, कारण ह्या मशीन्स दिसतील अशी / visible बटणं वापरून काम करतात आपली बटणं अदृश्य असतात एवढाच काय तो फरक / बदल, माझ्या दृष्टीने. 

Listen in my voice this tiny story on: https://youtu.be/ARWCY_QQtbM

Locate me also on Facebook and Twitter too: https://twitter.com/DrPreetiMulay

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...