अगदी प्रत्येक जण ह्या धरतीवर कृपा ह्या शब्दाबद्दल आणि त्याच्या परिणामा बद्दल सजग असतोच. सगळेच जण आपापल्या दृष्टीने कृपा ह्या शब्दाचा अर्थ लावत असतात.
कोणाला असं वाटत कि मोठं घर गाडी पैसा आहे म्हणजे नक्की कृपा आहे,
तर काही जणांना वाटत कि घर जरी छोटं असलं तरी डोक्यावर छप्पर आहे आणि सगळ्यांच्या तब्बेती ठणठणीत आहेत म्हणजे मोठी कृपा आहे ई.
प्रत्येकाचा दृष्टीकोन (मोजमाप) अगदी वेगळा आणि बरोबर देखील. ह्यात मी पण आलेच. माझं हि न कळत कृपेचं मॅपिंग चालूच असत मनातल्या मनात.
एवढ्यातच अचानक सरकारी आदेशानुसार आम्ही लवकर निघतो आहे ऑफिस मधून कारण ६ वाजता संध्याकाळी सगळं बंद होत त्यामुळे. लवकर निघण्याचे समजल्यावर ताबडतोब बस मधे चर्चेला उधाण आलं. "मग आता आपल्याला लवकर बोलावणार का?" ई.
त्यातच माझ्या मुलांची १२वी बोर्ड प्रॅक्टिकल सुरु झालेत आणि त्यामुळे ह्यांना सकाळी शाळेत देखील जावं लागत सोडायला मुलांना.
"शाळेत देखील...." ह्याचा अर्थ: माझा बस स्टॉप साधारणतः १ किलोमीटर दूर असल्यामुळे आणि माझे पाय कुरबुरत असल्यामुळे ह्यांना मला सोडायला आणि घ्यायला यावंच लागत.
जर माझं हि ऑफिस लवकर झालं असत तर थोडीशी धावपळ आणि पंचाईत झाली असती.
पण तसं का$$$ही झालं नाही. माझ्या दृष्टीने हि कृपाच आहे "त्याची" नक्कीच. प्रत्येक वेळी, क्षणोक्षणी / पदोपदी सांभाळलं आहे आज पर्यंत इतकी वर्ष "त्याने". मनापासून धन्यवाद.
Listen to this story on YouTube, click on: https://youtu.be/4AjAuhj5BKo
On Twitter: https://twitter.com/DrPreetiMulay
And also on Facebook.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा