बुधवार, ७ एप्रिल, २०२१

सुट्टी आणि परमानंद

मला तर कुठलीही आणि कितीही दिवसांची सुट्टी मिळाली कि परमानंद होतोच, पण माझ्या शिवाय अजून कोणाला तरी होतो, त्याच्या बद्दलच आज मी लिहायचं ठरवलं आहे. ओळख पाहू कोण ते? नाही नाही, सगळे अंदाज सपशेल चुकले हो तुमचे. 


आज मी माझ्या बरोबरीने रोज ऑफिस मधे येणाऱ्या एका सखी बद्दल बोलते आहे. येस, माझ्या डब्याची पिशवी. बिचारी, तिला देखील थोड्या फार प्रमाणात चटके बसतातच ना, कारण सकाळच्या घाईत बरेचदा थोडंस गरम असतांनाच डबे भरले जातात आणि मग तिची पण सैर असते आधी दोनचाकीवर बस स्टॉप पर्यंत, मग बस ने ऑफिस पर्यंत, मग माझ्या बसायच्या जागी आणि अशीच वरात परत पण. 


दुसरा आणि चौथा शनिवार रविवार बिच्चारील आराम होतो थोडासा पण अगदी माझ्या सारखी आहे ती, अधे मधे सहज बदल म्हणून सुट्टी मिळाली रे मिळाली कि फारच खुश होते. आज मी "वर्क फ्रॉम होम (Work From Home)" करत आहे त्यामुळे तिची संपूर्ण सुट्टीच ना. सकाळपासून वाकुल्या दाखवून खुणावते आहे असा मला भास होतो आहे, त्यामुळेच हा छोटेखानी पंक्ती प्रपंच. डॅम्बीस कुठली.

https://twitter.com/DrPreetiMulay/status/1382215404911697925?s=20
 Listen to this story on YouTube by clicking this link please: https://youtu.be/DkRu_8DKKLQ 

On Twitter : https://twitter.com/DrPreetiMulay,  httphttps://twitter.com/DrPreetiMulays://twitter.com/DrPreetiMulay/status/1382215404911697925?s=20
https://twitter.com/DrPreetiMulay/status/1382215404911697925?s=20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...