सोमवार, १९ एप्रिल, २०२१

डाग अच्छे है - भाग २

 एवढ्यातच माझ्या मुलांची प्रॅक्टिकल परीक्षा झाली बारावीची. संगणक, भौतिक शास्त्र आणि गणित ह्या लॅब करताना वेगळेच अनुभव आले विद्यार्थ्यांना.  कारणं अनेक आहेत. त्यांना जवळपास एक वर्षांनी शाळेत जायला मिळालं होत, तो युनिफॉर्म पुन्हा एकदा आणि बहुतेक शेवटचा घालायला मिळाला, मित्र मैत्रिणी शिक्षक ह्या सगळ्यांची भेट झाली प्रत्यक्ष, शाळेलाही गदगदून आलंच, साहजिक आहे ते, इतकी वर्ष जिने सतत फक्त किलबिलाटच अनुभवला तिला अचानक इतकी भयाण शांतता अगदी नकोशी झाली होती. 

असो. 

तर, मी उत्साही, कारण सोमवारी रसायन शास्त्राची परीक्षा होती. माझी शनिवार देखील सुट्टी झाली होती, माझे पाय एकदम शांत होते, मग मी माझे पण आठवड्याचे कपडे इस्त्री करतच होते तर अनायस्या म्हटलं द्या काही असेल तर. दोघेही एका स्वरात म्हटले  "लॅब कोट". मी पण उत्साहात इस्त्री करायला सुरवात केली आणि असं आढळलं कि त्या सो कॉल्ड पांढऱ्या रंगाच्या "लॅब कोट" वर पांढरा रंग शोधून सापडणार नाही इतके असंख्य डाग होते, रादर अप्रतिम अशी सुंदर कलाकृतीचं तय्यार झाली होती जणू. मला इतकं लई भारी वाटलं म्हणून सांगते, म्हटलं दिसतंय खूप एन्जॉय केलंय रसायनशास्त्र. ह्या अश्या भारावलेल्या अवस्थेत दोन कोट कधी अप्रतिम इस्त्री झाले मला देखील समजलं नाही. 

कित्ती वर्षांनी मी "लॅब कोट" ला इस्त्री केली माहिती आहे, बहुतेक १९८८ नंतर त्या रविवारीच. अहाहा. भन्नाट छोटेखानी अनुभव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...