मी मागे एकदा लिहिल्या प्रमाणे प्रत्येक सजीव किंवा निर्जीव व्यक्ती अथवा वस्तू तुमच्या संपर्कात येते ती फक्त योग्य वेळेलाच आणि राहते / टिकते फक्त योग्य कालावधी पुरती, किंचित कमी नाही का जास्त. मग तो एखादा बहुमूल्य सल्ला देणारा
- चित्रपट असो
- व्यक्ती
- वाक्य
- म्हण
- अनुभव
- स्वानुभव
- प्रसंग
- घटना
- वस्तू
- पदार्थ
- जिन्नस ई.
त्या कालावधी नंतर मग तुम्ही म्हणे समर्थ असता स्वतःला आणि इतरांना सांभाळण्याकरता म्हणून हा ठरलेला कालावधी आणि सहवास. प्रत्येकाला अगदी प्रत्येक गोष्ट अगदी पर्मनन्ट, कायमची राहावीशी वाटते शाश्वत असल्यासारखी. कदाचित बऱ्याच जणांना आपण देखील असावं असं वाटतं असणार त्यांच्या सोबत अगदी नेहेमीसाठी, पण ह्या संपूर्ण अशाश्वत विश्वात हे संभव नाही. त्यामुळे खूप समीकरणं मांडण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. ह्याचा अर्थ काहीही घाईत करा, निर्णय घ्या असं नाही. संपूर्ण चौकशी करा, विचाराअंती सगळं करा पण त्याला मर्यादा असू द्या. मन विचलित होणं स्वाभाविक आहे मग त्यावेळी उत्कृष्ट घटना, प्रसंग, वाक्य, म्हणी ई. आठवा, हात जोडा, "त्याचं" स्मरण करा, आप्तस्वकींसोबत वेळ घालावा, छंद जोपासा आणि तुम्हाला त्यातून नक्की मार्ग सापडतं जाईल हे निश्चित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा