शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

वाढणे

मी शरीर विज्ञानाची तज्ज्ञ नाही पण ऐकीव माहिती आहे आणि शिवाय काही डॉक्टर्स कडून किंचित तपासून घेतलंय जे माझ्या मनात आलं आहे ते. जन्माला आल्यापासून ते त्या नंतरची बरीच ठराविक वर्ष प्रत्येकाची वाढ होत असते, शारीरिक आणि मानसिक. शरीराची उंची वाढणे म्हणजे प्रत्येक अंतर्गत अवयवाची वाढ होणे. प्रत्येक अवयव हा प्रत्येक दिशेने वाढतो, वरच्या, खालच्या, आडव्या ई. त्याच्या त्याच्या स्वभाव धर्मा प्रमाणे, त्याला आखून दिल्या प्रमाणे. वाढ होणं बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. माझ्या मते शारीरिक वाढ खूप काही शिकवून जाते, जेव्हा वाढण्याचं वय असतं तेव्हाच नाही तर त्या नंतर सतत. निसर्गानेच बघा ना कसं ठरवलं आहे कि प्रत्येक हाडांची, त्या बरोबर अगदी सगळ्यांची वाढ आधी नमूद केल्या प्रमाणे वरच्या दिशेला जितकी होते तितकीच खालच्या दिशेने सुद्धा. ह्याचा अर्थ प्रत्येकजण जितके स्वतःला मोठं झालेले समजतं (गैरसमज) तेवढ्याच प्रमाणात त्याला जमिनीवर भक्कम पाय रोवून घट्ट उभं राहण्याची "त्याने" सोय केलेली असते. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बहुतांशी सगळेच उंचच उंच भरारी घेऊ इच्छितो, किंबहुना घेतोच. इतका उंच जातो कि परतणं अत्यंत अशक्य आणि अवघड होतं. हे असं उडणं प्रत्येकवेळी, प्रत्येकाला फायद्याचं ठरतं असं नाहीच. मग त्या बेसलेस उंचीवर टिकाव अवघड होतो आणि मग आपटायची भीती असतेच. 

त्यामुळे निसर्ग दर्शवतो आहे असंख्य वर्ष त्या बाबींकडे लक्ष द्या. तुम्ही कुठल्याही वयोगटात असाल तरी अजूनही किंवा कधीही उशीर होत नसतो. आत्ता हे लक्षात घ्या आणि त्या प्रमाणे फक्त स्वतःच्या परमानंदासाठी तरी हा फॉर्मुला, हि वाढण्याची पद्धत / कन्सेप्ट लक्षात घ्या आणि बघा तर आजमावून. 

मी येथे मांडलं तसं नसतं तर एकाच दिशेने काही किंवा सगळे अवयव वाढले असते. पण सरसगट सर्व मानवांच्या बाबतीत हे घडतं म्हणजे त्यात तथ्य आहेच. हे असं नसतं तर शरीर बेढब दिसलं असतं कदाचित आणि त्याचा परिणाम मग बाकी बऱ्याच सामाजिक स्तरावर / गोष्टींवर झाला असता. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हि एका सुबक सुंदर आकारात लागते, मग वैचारिक पातळीवर उत्कृष्ट फॉर्म कडे लक्ष द्यायला हवे, चाचपडून बघायला हवे.  प्रिव्हेंशन इज ऑल्वेज बेटर द्यान क्युअर.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...