माझे बाबा स्थापत्य अभियंता होते. त्यांच्या कामाचा महत्वाचा भाग म्हणजे विविध रस्ते बंधारे आणि धरणं बांधणे ई. ते नेहेमीच मला त्यांच्या कामाचे अनुभव कथन करत असतं तेव्हा ते म्हणायचे कसे रस्ते बांधतांना नेहेमी जर सरळ रस्ते बांधले तर ते योग्य नाही. रस्त्यावर वळणे हवीत, उंचवटे हवेत, उंचसखल भाग हवेत ई. का म्हटलं तर त्यामुळे तो वाहनचालक सतर्क राहतो. सरळ रास्ता धोकादायक, खूप दूर वर एकसारखे रस्ते नसावेत, झोप येऊ नये म्हणून हा उपाय. फारच साधा उपाय. असं काहीसं म्हणे स्थापत्य अभियांत्रिकी करते वेळी शिकवलं जातं, तांत्रिक ज्ञानाशिवाय.
आज मला ह्या बाबांनी सांगितलेली छोटीशी गोष्ट आठवली, स्मरली, अचानक.
मी माझ्या विद्यार्थ्यांची हजेरी भरत होते सॉफ्टवेअर मधे, तेव्हा बघितलं तर काही उपस्थित होते आणि काही अनुपस्थित. दररोज एकाखाली एक जसे विद्यार्थी येतात, नाही येत त्या प्रमाणे टिपून घेतलं होतं मी. अगदी वळणदार, चढउतार असलेल्या रस्त्यासारखं. सगळेच विद्यार्थी एका रांगेत उपस्थित किंवा सगळेच अनुपस्थित असणं किंचित अशक्य. माझ्या सारख्या शिक्षकाला थॊडासा बदल, विचार करायला, समुपदेशन करायला विचार करणारे असे महत्वाचे P मधे मधे असलेले AB. अहाहा च. AB कसे कमी होतील हे नकळत मनात येतंच आणि मग त्या दृष्टिने प्रयत्न होतात. त्यामुळे P सोबत AB पण फार महत्वाचे, हजेरी घेणं, ते रजिस्टर सगळी प्रक्रियाच खूप शिकवून जाणारी अशी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा