•मी परवा माझ्या
नेहेमीच्या सवयी प्रमाणे पाठकोऱ्या कागदावर आठवलेल्या आणि लागणाऱ्या वस्तू लिहीत
होते. त्याच्याच खाली मीच सांभाळून ठेवलेला अजून एक पाठकोरा जाहिरातीचा कागद होता.
मी हवं ते घाईघाईत लिहिलं खरं पण थोड्यावेळाने मला काहीतरी खालच्या कागदावर
उमटलेलं दिसलं. बघते तर महद आश्चर्यम, कार्बन पेपर वापरावा असं त्या खालच्या
कोऱ्या कागदावर उमटलं मी जे लिहिलं होत ते. मग काय मला सगळं आठवलं मी अनेक वर्ष
वापरलेल्या कार्बन पेपर बद्दल. अहाहा, किती जपून वापरावे लागत होते ते. आधी तर
फक्त एकाच रंगात येत होते, पण नंतर अजून एक असं करता करता अनेकविध रंगात उपलब्ध
झाले. बरं असे कार्बन पेपर वापरून लिहायचं म्हणजे आधी एकावर एक कागद नीट ठेवला /
मांडला आहे का नाही हे बघावं लागत असे. त्यानंतर हात लिहितांना अलगद ठेवावा लागत
असे, नाहीतर खाली उमटायचे, आणि लिहितांना सुद्धा थोडं दाबून लिहावं लागत असे. अगदी
जर्जर होईस्तोपर्यंत तोच कार्बन पेपर वापरला जायचा. भन्नाट दिवस होते खरंच. आता
फक्त कधी तरी कुठल्याश्या बिलबुक मधे बघायला मिळतो हा अनोखा कार्बन पेपर. पण काही
का म्हणा भयानक संयम / चिकाटी आणि असे अनेक गोष्टी निर्माण झाल्या आणि टिकल्या
त्यामुळे आपल्या त्या पिढीच्या स्वभावात / वागण्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा