अनेक दशकं / शतकं आपण वाचतोय, ऐकतोय आणि बोलतोय ह्या दोघांबद्दल. शिवाय त्यांच्या बद्दल तर सर्वच गोष्टी जगमान्य आहेत, वैज्ञानिक दृष्ट्या आणि नैसर्गिक सर्वश्रुत अश्या. पण काल मी अचानक एक चित्रपट बघितला, लघुपट होता तो खरं तर आणि त्यात त्याचं दर्शन घडलं. त्यामुळे एक नवीन दुर्ष्टीकोन उभा ठाकला माझ्या डोळ्या देखत. कितपत योग्य आहे ह्या भानगडीत न पडता मी ह्या सुचलेल्या बाबी टिपून ठेवायच्या ठरवल्या. बास इतकंच.
समुद्राचा आणि नदीचा स्वभावच मुळी भिन्न. प्रवाहाची दिशा, पाण्याची चव, किनारे, वाहतूक, पातळी, उद्देश, आणि हि यादी प्रचंड मोठी आहे. अगदी माझ्या शाळेच्या दिवसांपासून मी माननीय विज्ञानाच्या शिक्षकांकडून शिकले आहे समुद्राच्या लाटांबद्दल, भरती-ओहोटी संदर्भात. अवाढव्य आकाराच्या बोटींमधून प्रवास देखील अनेक दिवस केला आहे. समुद्रसपाटी अनुभवली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. रक्षाबंधनाबद्दल आणि खास करून नारळी पौर्णिमा का म्हणतात ह्या बद्दल मुलांना समजावून सांगितले आहे, महत्व सांगितले आहे. सगळं म्हणजे सगळं त्या सागरचं / समुद्राचं माहितीपूर्वक महत्व माहित आहे, तरी देखील काल वेगळंच काही तरी समोर आलं, ते असं कि जरी त्या पाण्याची शक्ती अपार आहे, शब्दात बांधण्यासारखे नाहीच, इतकी कि माझे शब्दभंडार नक्कीच कमी पडणार. कितीही ताकद, सामावून घ्यायची शक्ती असली तरी माणसं एकामागोमाग एक अती अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरु ठेवत आहे समुद्राच्या पाण्यावर, जसे कि त्या नैसर्गिक साठ्यावर त्यांची मर्जी चालते. आपली सैनिकांची जल वाहतूक, किंवा तेलाची देवाण-घेवाण ई. अत्यावश्यक मालाची वाहतूक ठराविक वेळेला समजू शकतो, पण काही बोटावर मोजणाऱ्या गणपती बाप्पांचे विसर्जन होतं आधी आणि आता तर विचारांच्या पल्याड आहे सगळं, सहलीसाठीच्या असंख्य / अगणित बोटी असोत, मासेमारीसाठी सतत, ई. जी हि माणसं सुटली आहेत त्यामुळे देखील, भयानक वाहतुकीमुळे, वजनामुळे कदाचित तो रागावला आहेच, किती सहन करणार तो आणि का?. त्यामुळे भरती-ओहोटीच्या स्वभावात फरक पडला आहे आणि तो घातक आहे. मी मागे एकदा-दोनदा नमूद केल्याप्रमाणे जशी ढगांची वस्ती असते, कुटुंब असतं, त्यांना माणसांनी त्रास देणे, शांततेत भंग करणे ह्याची मुभा नाहीच, पण तसे ह्या पाण्याच्या साठ्यांबद्दल घडतंय. "अती तेथे माती" होण्याच्या आधी जागे व्हा, नंतर दोष देण्यात अर्थ नाहीच त्या निसर्गाला. ती माणसं आवरा आणि तो समुद्रसाठा जपा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा