बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

डब्बी

माझ्या लहानपणीच्या असंख्य आठवणींचा खजाना आहे माझ्या सोबत आणि अधूनमधून त्यातील बऱ्याचश्या आठवणींना उजाळा मिळतो. काही वस्तू डोळ्यासमोर उभ्या ठाकतात आणि बास, मग काय मी पट्टकनी काढते माझी लेखणी. त्या काळी पुरुषांचे म्हणाला तर त्यांच्या खिशात तेव्हा बऱ्याच डब्या असायच्या, काही डबे देखील. अर्थात ज्या पद्धतीचे काम पुरुषमंडळी करायची त्या मानाने डब्बी किंवा डबे असायचे. काथ - चुन्याची डबी, लवंग - विलायची ची डबी, काहींना प्रकृतीप्रमाणे छोटेखानी व्हिक्स ची डबी बाळगायची सवय, माचीस / काड्यापेटीची डबी, बिडी / सिगरेट / तंबाखुची डबी, कपाळावर गंध लावण्याची सवय असेल तर ती डबी, जेवणाचे डबे + चटणी / लोणच्याची डबी, आणि इतर. मुलींचे किंवा बायकांचे थोडेसे वेगळे होते. त्या काळी टिकल्या कमी प्रमाणात होत्या पण त्या पिटुकल्या डबीत यायच्या, त्यामुळे टिकल्यांची डबी, नाहीतर गंधाची डबी, कोरड्या कुंकवाची डबी, काजळाची डबी, सोफ / सुपारी डबी, खाऊचा डबा, औषधांची डबी, आणि इतर अनेक. व्यक्ती तितक्या प्रकृती, तश्या अनेक पद्धतीच्या डबी, किंवा डबे. त्या काळी प्लास्टिकचा सर्रास वापर होत नसे, उपलब्ध नसे त्यामुळे बऱ्याचश्या गोष्टी, पदार्थ ई. डब्यात आणावे लागायचे. त्यामुळे विविध डब्बे / डबी वापरण्याची प्रथा होतीच. मग प्लास्टिकचा बढेजाव वाढल्यावर मग सुटलेच सगळे आणि डबी पण अस्तित्वात होती हे थोडसं विस्मृतीत गेलं होतं. जुन्या गोष्टी नव्या ढंगाने समोर येतात तसेच काहीसे सध्या मला आढळते आहे. 

अर्थात आकार, प्रकार, उकार ई. बदलले असले तरी ते माझ्या दृष्टीने डबेच / डबीच आहे कारण त्यांना एक प्रकारचा आकार आहे, ती जागा व्यापते, ती काही भरून नेण्यास उपयोगी ठरते आणि बरेच असे उपयोग सांगता येतील. ह्या यादीत आहेत स्वतःचे संगणक जे आपण ने-आण करतो आणि केस अक्का डबी, मोबाईल अधिक कव्हर अक्का डबा, त्या बरोबर चे अविभाज्य घटक पॉवर बँक, एअर पॉड आणि डबी, वायर्ड / वायरलेस इअर फोन / हेडफोन आणि डबी,  मेकअपचं अत्यावश्यक सामान + डबी / डबा, आभूषणांचा डबा / डबी, औषधे ठेवण्याची खास डबी, जेवणाचा डबा आणला तर नाही तर बाहेरून विकत घेतलेले पदार्थ, उरलेले पदार्थाचा डबा, पेन, पेन्सिल आणि इतर वस्तू ठेवण्याचा डबा आणि इतर बरेच.  

तेव्हा आणि आता पिटुकला फरक आहे पण वैविध्य डब्या काही साथ सोडत नाहीच अगदी प्रत्येकाची. 

त्यामुळे ह्या डब्यांचे महत्व जाणून घ्या आणि त्यांना सांभाळा, कारण हे सर्व आपले दैनंदिन साथीदार आहेत अतूट बंधन असलेले, श्वासोगणीत लागणारे असे. प्रत्येक वयातील वेगळे असे, गरजे प्रमाणे बदलावं घडवून आणणारे, डबीतल्या / डब्यातल्या जिन्नसाला एक सुरक्षित कवच देणारे असे भक्कम.  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...