ज्या चमूने १९६० च्या दशकातल्या सुप्रसिद्ध हिंदी गाण्यांच्या धून कराओके च्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या त्यांना सर्वप्रथम प्रणाम. ज्यांना हे कराओके तंत्रज्ञान वापरून करावं असं सुचलं त्यांना शतशः धन्यवाद. जी गायक मंडळी किंवा गाण्याची शौकीन, अभ्यासक आहेत जे कराओके शिताफीने वापरतात, वैविध्य रचना सादर करतात त्या सर्वांनाचे कौतुक. कराओके वापरायचं म्हणजे आधी १९६० ते ८० च्या महासागरातून अद्वितीय मोती ओंजळित अलगद वेचायचे, त्याची धून, शब्द रचना आहे कि नाही ते तपासायचे, ते संगणकावर उतरवायचे, त्यांची एक संचयीका अक्का फोल्डर तय्यार करून, नामकरण करून क्रमवार लावायचे म्हणजे आव्हानात्मक काम आहे ७०-७५ च्या युवकाला. हे सगळं करुन, आटोपशीर कार्यक्रम बांधून आज सादर केला आरोह ह्या नवीन स्थापन झालेल्या गाण्याच्या समूहाने. पुण्यातल्या प्रसिद्ध अथश्री ह्या बाणेर भागातील सदनिकेत सादर झाला १५ मधुर, श्रवणीय आणि लोकप्रिय गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. खूप प्रेरणादायी सुरवात आहे हि, "जो थांबला तो संपला" हे सिद्ध करत, तंत्रज्ञान शिकून, मदत घेऊन, कुठल्याही साथीदारांवर अवलंबून न राहता प्रत्येक सादरीकरण उत्कृष्ट झालं.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा