शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

खरं रहस्य

गेले अनेक वर्ष डायनींग टेबल घरी असणं हे एक आधुनिक कुटुंबाचं लक्षण आहे. ते टेबल हे स्वयंपाक घर किंवा दिवाणखाण्यातला अविभाज्य भाग आहे. आज शनिवार, शिवाय दिनदर्शिके प्रमाणे नवीन वर्ष जवळ येऊन ठेपले आहे त्यामुळे आजचे वर्तमानपत्र हे फार अवजड होते, प्रचंड जाहिरातींचा भडिमार नुसता.  असंख्य जाहिराती आज माझ्या डोळ्यांनी टिपल्या आणि त्या घरातल्या सामानाच्या होत्या, बहुतांशी सोफा, डायनींग टेबल, पलंग ई. दर्शवणाऱ्या. मी अनेकदा पाहून खात्री केली कि त्या जाहिरातीत किंवा त्या दुकानात सहा खुर्च्या आणि टेबल ह्याची किंमत गगनाला भिडलेली अशी होती आणि दोन-तीन प्रकारचे आलिशान सोफे मात्र कमी किंवा वाजवी किमतींचे होते. 

मी अजून एक टिपलेली गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षे खुपश्या घरात, प्रत्येक घरात नाही, कितीही मोठे टेबल असले तरी ताट हातात घेऊन सोफावर बसून जेवायची पद्धत असते. त्याची कारणे अनेक आहेत, एक म्हणजे दूरदर्शन बघता बघता, गप्पा मारता मारता जेवणाचा आनंद उपभोगता येतो, त्या शिवाय पाय मोकळॆ करण्याकरता / पुन्हा वाढून घेण्याकरता, त्या निमित्याने पोटात थोडीशी जागा निर्माण करण्या करता उठता येतं, एकाच जागी बसून जेवायची गरज नाही, खूप लोकं असली तर देखील सोफा सोयीचा म्हणून वापरला जातो ई. पण हि सर्व कारणं मुळमुळीत झाली हो, आज मला एक महत्वाचं कारण समजलं. सोफ्याच्या किमती जर जास्त स्वस्त आहेत तर जास्तीचा एक टेबल घ्या, तो सांभाळा, मांडा - उचला, स्वच्छ ठेवा आणि शिवाय सहा खुर्च्या, एक टेबल म्हणजे कुणाकुणाची अडगळ पण होऊ शकते नाही का? त्यामुळे कोणी सांगितलं आहे. नाही तरी सोफावरचं बसायचं असतं मग सोफाच घ्या ना? सोप्प आहे. 

अजून एक कारण म्हणजे त्या जाहिरात दिलेल्या दुकानांमधले सोफे विकले जात नसतील म्हणून देखील त्याची किंमत फार कमी दाखवली आहे. 

काहीही असो, टेबल असो किंवा सोफा, जमिनीशी जेवतांना असलेलं नातं तर कधीच संपुष्टात आलं आहे. उत्कृष्ट पचन क्रिया होण्यासाठी जमीनीवर बसण्यासारखं आसन दुसरं नाहीच, शिवाय उत्कृष्ट व्यायाम होतो तो वेगळाच. शिवाय जमिनीवर बसून मांडलेली पंगत पण कुठेतरी विस्मृतीत गेलेली गोष्ट आहे. नाही तर संपूर्ण पंगत एकसाथ बसणार आणि उठणार देखील, शिस्त होती फार वेगळी आणि वैज्ञानिक महत्व असलेली अशी. काही दिवस नक्की लागतील पुन्हा जमिनीशी नाळ जुळायला पण एकदा जुळली कि "बल्ले बल्लेच". चला तर मग आज पासून सुरवात करून बघूया, ज्यांना शक्य आहे त्यांनी मांडी घालून जमिनीवर बसून जेवण करू या, अर्थिंग / भूयोजन / भूसंपर्कन चे सर्किट / फेरा पूर्ण करूयात, भारतीय पद्धत आत्मसात करूयात आणि बहुतांशी रोगांना दूर ठेवुयात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...