माझ्या लहानपणीचे दिवसचं काही और होते. का कुणास ठाऊक पण माझ्या आईला काही तरी समज / गैरसमज होता. माझ्या सारखी मागे लागली असायची गळ्यात छोटीशी साखळी घाल, हातात एखादी बांगडी असू दे, कानात घालावं, छोटीशी अंगठी हवीच ई. बाप रे. नेहेमीचंच असायचं तिचं. अर्थात त्यावेळी सगळं सोन्याचं, खोटं घालण्याची प्रथा पण नव्हती आणि सुरक्षितता होती हे महत्वाचं. दिखावा म्हणून नाहीच मुळी पण (थोडीशी मोठी झालेल्या) मुलीची व्याख्या तिच्या दृष्टीने अशी होती म्हणून. मी कधी ऐकायचे, कधी नाही ... असो. एवढ्यात मी काही तरी बघितलं किंबहुना माझ्या चार डोळ्यांनी ते टिपलं असं म्हणणं जास्त योग्य आहे. दक्षिण भारतात भरपूर सोनं परिधान करण्याची सवय आहे किंवा प्रथा आहे, मुलींमध्ये किंवा लग्न झाल्यावर जास्त. ठळक दागिने असतात त्यांचे. इतके ठळक कि सहज नजरेस पडतातच, कुठलेही कष्ट घ्यावेच लागत नाहीत. मी काही वर्ष हैदराबादेत वास्तव्याला असल्यामुळे मला जरा ते जास्त जाणवलं. मी एका मुलीला बघते जी अशीच एका दाक्षिणात्य भागातली आहे ती भलं मोठं त्यांच्या पद्धतीचं गळ्यात घालते कदाचित मंगळसूत्र असावं, आणि अर्थात सोन्याचं. पण कानात, हातात खोटं. आणि ते खोटं इतकं खोटं असतं कि पट्टाकिनी निदर्शनास येतंच. हा अर्धवट प्रकार मला अजिबात समजला नाहीच. सोनं घालण्याची आणि मिरवण्याची ताकद आहे मग का असं? आणि ते खोटं कुठल्याही रंगसंगतीशी जुळणारं देखील नसतं, मग का? घालायचं आणि मिरवायचं तर शिस्तीत, ऐटीत, नाहीतर नाही, म्हणजे हे फक्त माझं म्हणणं झालं बरं का, आणि ते दिसायला पण खूपच विजोड दिसतं. आजकाल इतकं अतरंगी कोणी घालून येत नाही सहसा म्हणून विचार आला सहज मनात, बाकी काही नाही. थोडसं लक्ष दिलं कि, रंगसंगती जुळवली कि, स्वतःला आणि इतरांना पण उत्साही वाटतं. दागिन्यांतच नाही तर आपण सर्वार्थाने जेवणात, वागण्यात, बोलण्यात, उठण्यात, बसण्यात एकसूत्रता राखावीच.
शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा