आधीच्या काळी पायात जड, जाड आणि वैविध्य प्रकारच्या धाटणीतले, कातडे वापरून तय्यार केलेले बुटांचे असे बरेच प्रकार बघायला, ऐकायला मिळायचे. विविध देश फिरायला मिळाल्यामुळे तिथल्या वातावरणाला साजेसे, संस्कृतीयोग्य असे पण बूट बघितले, न्याहाळले आणि त्याची योग्यता समजावून देखील घेतली. आताशा गेली काही वर्ष हलक्याफुलक्या जोड्यांचा / बुटांचा जमाना येऊ पाहतो आहे. सहज सोप्या पद्धतीने काल-घाड करता येतील असे. बुटांच्या प्रकारांबद्दल बोलू तेवढं थोडंच आहे. पण आज मी त्याच बुटाच्या साथीदाराबद्दल खरं तर सुतवाच्य करणार आहे ते म्हणजे मोजे. अगदी लोकरीचे, कापसाचे, नायलॉन तत्सम धागा वापरून घडवलेले, नायलॉन + कापूस आणि बरेच प्रकार. काही खेळाडूंना अगदी घुढग्यापर्यंत उंच मोजे, तर काही जरासे खाली, पायाच्या घोट्यापर्यंतच, अंगठा असलेले, कातडीच्या रंगांचे, आणि आताशा तर दिसेनासे पिटुकले. अशी प्रचंड श्रेणीचं आहे ह्या मोज्यांच्या प्रकारांची. मोजे हे पाय, पायांमुळे / पायांशी संदर्भात होणारे नैसर्गिक बदल ह्यांच्यातील आणि बुटांमधला खरं तर दुआ आहे. मोज्यांच एक अनन्य सामान्य महत्व आहेच, पायांसाठी, बुटांसाठी आणि आजूबाजूच्या इतर लोकांसाठी देखील. मोज्यांचा रंग कचेरीत जातेवेळी कसा असावा हे देखील फार महत्वाचे असते. मोज्यांचं असं महत्व डावलून चालणारंच नाही. पण आताशा मला हे आढळून आलं आहे कि मोजे न परीधान करणे हि एक फॅशन आहे मोठ्या समजणाऱ्या लोकांमधे, त्यामागची कारणे मला ठाऊक नाहीत.
दररोज मी ऑफिसला जातेवेळी काही फर्लांग एका वस्तीतून बाहेर पडते त्यावेळी माझ्या चार डोळ्यांनी हे टिपले कि बरीशी शाळकरी मुलं शाळेला जायलाच फक्त महत्व देतात. कधी त्यांचे बूट फाटलेले किंवा नवीन नसतात, मोजे नसतात किंवा घातलेले नसतात, कधी गणवेश असतो नसतो, पण ते घोळक्याने मार्गक्रमण करतांना दिसतात, थांबत नाहीत, असंख्य तक्रारी करत बसत नाहीत, वेळ घालवत नाहीत. हि आर्थिक तफावत मला प्रकर्षाने जाणवली. एका गटाकडे नाही, परवडत नाही, गरज भासत नाही, ध्येय फक्त गाठायचं आहे ई. तर दुसऱ्या गटाकडे मोजे असून, विकत घ्यायची ताकद असून वापरले जात नाही असंख्य कारणांमुळे किंवा आळस म्हणून, कोणासठाऊक. अक्षरशः दर दिवशी मला काही ना काही नवीन अनुभवयाला मिळतंच ऑफिसला जाते-येते वेळी. "माझ्या कडे हे नाही ते नाही..." अशी रडगाणी जे गातात त्यांनी ह्या अश्या सामान्य गटाकडे निश्चित बघावे, आणि यश / उंची गाठण्यासाठी सरस किंवा कष्टाने कमावलेल्या उच्च पदस्थ लोकांच्या एकंदरीत पदपथकाकडे.
मी ह्या आधी एकदा एका अनुकथेत लिहिल्या प्रमाणे लग्नासाठी स्थळ बघायला गेलात आणि फाटलेल्या मोज्यातून जर बोटं / अंगठा बाहेर डोकावतांना नजरेस पडला म्हणजे काही तरी व्यक्तिमत्व आणि व्यक्तिव ह्यात घोळ आहे हे निश्चित, अहो सरते शेवटी संपूर्ण आयुष्याचा मामला आहे, नाही का?
बघा असे हे पिटुकले मोजे पण काय काय शिकवतात आणि दर्शवतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा