आमच्या अगदी शेजारी एक कुटुंब राहत. त्यांनी ज्यावेळी घर घेतलं त्यावेळेपासूनच ते सांगतात त्याच्या वडिलांबद्दल किंबहुना वडिलांचच्या प्रकृती स्वास्थ्या बद्दल. त्यानंतर आमचे शेजारी २ वर्षा करता परदेशी गेले होते. परत येण्याचं कारणही बाबांची तब्येतच होती. असो. एकदाचे नेहेमीकरता जेव्हा आमचे शेजारी परत आले तेव्हा त्याचं घर नीटनेटकं लावून देण्याकरता त्यांचे आई बाबा आले नागपूरहून. तसे दिसायला कृश वाटत होते दुरून, पण हळू हळू त्यांच्या रॊजची कामे बघून अवाकच झाले मी. दोनचाकी वर काकूंना घेऊन दररोज ताजी भाजी आणणे, नातवाला हाताला धरून संध्याकाळी फिरवून आणणे ई. मग माझी छानच ओळख झाली, गप्पा होत होत्या. एक दिवशी मी त्यांच्या कडे संध्याकाळी गप्पा मारायला गेले तर त्यांचा मुलगा आणि अजून दोन माणसं भली मोठी चारचाकी घेऊन धडपड करत होती. नवीन गाडी घेण्याचं चाललं होत, ती कशी बसते घर पुढे हे बघणं चाललं होत. बराच वेळ उलटी सरळ वगैरे पद्धतीने लावून बघणं चाललं होत. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी ती भली मोठी चारचाकी विकत घेतलीच आणि खूप दिवस पार्क करण्यासाठी गडबड चालायचीच होती त्यांची. एक दिवशी मी अवाक झाले, रविवार होता आणि शेजारच्यांनी तीच गाडी कोणी तरी एका झटक्यात पार्क केली देखील. नीट बघितलं तर ते आजोबा होते. देवा इतक्या शिताफीने त्यांनी गाडी हाताळली कि ज्याचं नाव ते, अहाहा. काय उत्साह होता आणि आहे त्या काकांमध्ये, जबरदस्तच. मानलं बुवा त्यांना.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२४६४: तळ गाठणे
आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा