मंगळवार, ३० मार्च, २०२१

माझा अनोखा सोबती / मित्र

ह्या आधीही लिहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा मला आज लिहावेसे वाटते आहे "त्याच्या" बद्दल. 

का? 

सांगते ना? 

अहो जरी हा माझा दोस्त झाला गेले अनेक वर्ष, पण त्या आधी मी संपूर्णतः अनभिज्ञ होते "त्याच्या" बद्दल, मला पुसटशीही कल्पना नव्हती. पण मग आलाच, पाहुणा म्हणून आधी, तेव्हा काहीही पर्याय नव्हताच पण अकॅसेप्ट करण्याशिवाय. मग काय दर महिन्याला न चुकता येऊ लागल्यामुळे दोस्ती करावीच लागली, हुषार व्हावचं लागलं मला आणि मग न कळत सवय कधी झाली हे हि समजलं नाही. 

हा, पण ह्या सगळ्या प्रवासात किंबहुना प्रवासाआधी त्याला माझ्या सारख्या अनेक मैत्रिणी होत्या. 

दर महिन्याची भेट इतपर्यंत ठीक होत (म्हणायला हो) 

पण बदमाश, 

आता जेव्हा पासून त्यालाच समजलं आहे कि तो मला सोडून जाणार आहे कायमचा, तेव्हा पासून दोनदा यायला लागलाय भेटायला. 

अरे काय, 

म्हणजे कायचं?  

मित्र येणार, न कळवता, ते हि मग तय्यारी, आवभगत, वेळ देणं ई. आलंच कि. 

देवा, आता बा$$$स. पुरे झालं, हुडक म्हणावं दुसरी आता. मित्र असला म्हणून काय झालं. 

अर्थात काहीही तक्रार तर नाहीच कारण करूच शकत नाही. त्यातही आनंदाने कसं राहावं हे नव्याने शिकते आहे मी. नवनवीन मार्ग शोधून काढते आहे. पेशंस इतका वाढलाय म्हणून सांगते, अहाहा, जबरदस्तच.  "आहे मनोहर तरी ...." कुठला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...