गुरुवार, २५ मार्च, २०२१

"शेतच कुंपण खातंय"

मला न उन्हाळा आला रे कि भरगोस नवीनतम अगदी आवडीच्या कामांची फार म्हणजे फार आठवण येतेच.  आई बाबा पण काय लई भारी होते ना कि मस्त वयाप्रमाणे काम दिले जायचे. ती विविधताच मला भावात असे. 

लहान असतांना अनेक प्रकारचे पापड (लाटलेले, पळी आणि अनेक असे) आई अगदी विचारपूर्वक करायची म्हणजे ते अक्ख्या वर्षभर पुरायचे. आणि माझं सगळ्यात महत्वाचं काम होत लहान शेंडेफळ असल्यामुळे कि अगदी सकाळी उन्ह होण्याआधी घातलेल्या पापडांकडे लक्ष देणे, चिमण्या, कावळ्यांपासून वाचवणे आणि त्या नंतरचा फ़ेज म्हणजे माझ्या लहान हातांनी हळूच आईच्या बरोबरीने किंवा तिने सांगितले म्हणून अगदी आज्ञा धारक पद्धतीने ते एक एक पापड उलट करणे. 

तेव्हा एक बाजू / वरची बाजू कोरडी / ड्राय झालेली असायची आणि पोटात ओलं. ते मला जे आठवतंय त्या प्रमाणे ४ पापड उलटे-सुलटे करण्या मागे एखाद-दोन माझ्या पोटात जात असे थेट. 

"शेतच कुंपण खातंय". 

पण तरीही कधीही पोट दुखलं नाही, आणि पापड कधीच कमी पडले नाहीत, आई कदाचित हे सगळं आधीच लक्षात घेऊन च पीठ तय्यार करत असे. ज्वारीचे, तांदळाचे,पोह्याचे आणि साबुदाण्याचे, एवढे पापड मला आठवतात पण त्यात सगळ्यात प्रचंड आवडीचे म्हणजे साबुदाणा आणि ज्वारी. 

अहाहा,  ह्या जगावेगळी चव असायची त्या अर्धवट वाळलेल्या पापडाची कि माझ्या कडे अजिबातच शब्दच नाही आहेत त्याचं वर्णन करण्याकरता, भन्नाट पेक्षा भन्नाट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...