अनेकदा आपण पालक म्हणतो कि "मुलांची शाळा असलेलीच बरी... एक रुटीन राहतं...". ते अगदी खरं आहे जेव्हा पर्यंत आपली मुलं थोडीशी लहान आणि आपल्यावर अवलंबून असतात. थोडी शिंग फुटली कि त्यांच्या मनात ते नक्की म्हणत असतील " आई बाबांचं ऑफिस असलेलच बरं.... एक रुटीन राहतं शांतता असते ई. ...". तर आता ह्या छोट्या दोस्तांना कसं बिझी ठेवायचं हा यक्ष प्रश्न आहे. तर येथे काही मी थोडेसे ऑपशन्स देत आहे, बहुतेक उपयोगी पडतीलच अशी आशा करते.
- विविध तुकड्यांचे पझल आहेत ऑनलाईन, बराच वेळ जातो आणि अनेक विकत घेतले तर वेळ छान जातो, २डी / ३डी ह्या फॉर्म मधे पण येतात हे गेम
- बोर्ड गेम्स, ते हि अनेक आहेत, सगळं कुटुंब खेळू शकतं
- पेशेन्स पत्त्याचा गेम जो अनेक प्रकारे एकट्याने खेळता येतो (मोबाइल वर नाही) फिसिकल पत्ते घेऊन
- विविध तुकड्यांचे पझल रंगीत बाजूने नाही, उलट्या बाजूने जोडण्याचा प्रयन्त करायचा, अतिशय मज्जा येते, वेगळीच मज्जा आहे ह्यात
- गॅस न वापरता पदार्थ करणे, जसे कि जॅम सॅण्डविच, मोनॅको बिस्कीट आणि त्यावर अनेकविध टॉपिंग्स, पोळीचा लाडू, मुरमुरे कच्चा तेल चिवडा...
- एखादा मराठी / इंग्लिश अल्फाबेट वरून घरातील, घराबाहेरील दिसणाऱ्या वस्तूंची नाव लिहिणे
- एखादा मोठा इंग्लिश शब्द देऊन त्यातले अक्षरच वापरून अनेक छोटे शब्द तय्यार करणे
- इसापनीती / चांदोबा / चंपक सारखे पुस्तक वाचणे, लायब्ररी लावून, ऑनलाईन नाही
- रोज काही ओळी लिहिणे, कुठल्याही भाषेत,आपल्या मित्र मैत्रिणी बद्दल, प्राण्यांबद्दल, झाडा बद्दल, आणि अनेक विषय देऊ शकतो वयानुसार
- काडेपेटीच्या काड्यांपासून विविध आकार / अक्षर तय्यार करणे
- एखादा आकार द्यायचा त्यांना आणि घरात / शाळेत किंवा अजून कुठे त्या आकाराच्या वस्तू लिहायच्या / चित्र काढायची
- जुने लहानमुले असलेले / प्राण्यांवर आधारित चित्रपट एकत्र बघणे जमल्यास आपल्या मातृभाषेत
- घरातील छोटी छोटी काम करणे रोज जसे कि धूळ पुसणे, पेपर नीट घडी करणे, कपाट आवरणे, भांडी लावणे पेले / चमचे ई.
- जुने पेपर वापरून विविध घड्या करून आकार करणे, पिशवी करणे ई.
- त्यांच्या वयाप्रमाणे पेपर वाचणे /थोड्या बातम्या
- रांगोळी काढणे रोज, अगदी अक्षर, फुल, पान ई काहीही
- कात्रण जमा करणे पेपर मधून, जुन्या पुस्तकातून
- "Twist-A-Tale" / जुनी गोष्ट नवीन स्वरूपात मांडणे
- मुलांनी पालकांना गोष्ट सांगायची / अनुभव सांगायचा
- चित्र काढणे, रंगवणे
- झाडांना पाणी घालणे रोज, न चुकता, जर घरी कुंड्या असतील तर
- एखादा दिवस त्यांनाच आधीच सांगायचं ठरवायला कि ते काय करतील त्या दिवशी
- चेंडू टप्पा टप्पा खेळणे घरच्या घरी, विविध आकाराचे चेंडू घेऊन
- दोरीवरच्या उड्या
- थोड्या प्रमाणात जमल्यास काही योगाचे आसनं त्यांच्या बरोबर करणे, एकत्र, व्यायाम म्हणून
- कधी झुंबा / डान्स घरीच एकत्र
- विविध डाळी ची ओळख करून देणे, थोडा वेळ मजेत जातो
- आवड असेल तर श्लोक आरत्या म्हणणे रोज, दिवसानुसार
- आई बाबा किंवा आजी आजोबांच्या उपस्थितीत लिंबू पाणी / कच्च्या आंब्याचं पन्ह करणे
- आई बाबा किंवा आजी आजोबांच्या उपस्थितीत छोट्याश्या भिंतीला / दाराला रंगवणे
- पत्त्यांचा बंगला
- पेपर कप चा बंगला
- कोथिंबीर / मेथी भाजी लावणे आणि त्याची काळजी घेणे
- रोज न चुकता चिमण्यां साठी पाणी ठेवणे गच्चीत
- बांगड्या असतील घरी तर त्यांचा वापर करून विविध आकार तय्यार करणे
- विविध व्यवसायांबद्दल माहिती देणे, त्यांना विचारणे त्यांना काय वाटत अगदी सोसाटीतल्या चौकीदारापासून, काम करणाऱ्या मावशी, शिक्षक ई. अनेक
- रोज प्रत्येक जेवणाच्या वेळेला टेबल वर वस्तु घेण्यास आणि आवरून ठेवण्यास मदत करणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा