मी अगदी काहीच दिवसांपूर्वी लिहिल्या प्रमाणे माझ्या आईकडे कोणताही पदार्थ केला कि तो देवासमोर ठेवला जायचाच, दररोज. आणि नैवेद्य हि संकल्पना च मुळी मला फारच भावते मनापासून, कदाचित अगदी न कळत्या वयापासूनच आईची शिस्त आणि कृती बघितल्यामुळे असेल कदाचित. असो.
तर बहुतेक एक दिवसाआड किंवा दररोजच म्हणा ना माझ्या ऑफिस ला ज्याच्या मार्गात दोन प्रसिद्ध मिठाई वाल्यांचे दुकान आहेत. तशी बाकीचीपण छुटुकली-पिटुकली आहेतच, पण हि दोन खास आहेत. त्यांच्या कडे वैविध्य मिठायांचा साठा / माल आलेला असतो जेव्हा आमची बस तेथूनच पास होते. माल उतरवणं चाललेलं असतं. मिठाईच्या दुकानात काचेच्या कपाटात जे ट्रे ठेवलेले असतात अल्युमिनियम चे ते च उतरवत असतात दुकानात काम करणारी मंडळी भराभर. त्या टेम्पो मधे एकावर एक शिस्तीत मांडलेले असतात ट्रे मिठायांनी भरलेले. ते एक एक किंवा एकावर एक जसे जमेल तसे गाडीतून एक जण देतो आणि दुसरा नेऊन ठेवतो.
आपण जेव्हा मिठाई विकत घ्यायला प्रत्यक्ष जातो तेव्हा तो मिठाई बॉक्स मधे भरणारा, बिल करणारा ई. डेन्झो / स्वीगी करतो तेव्हा अजून एक जणाची भर पडते. इतके सगळे जण म्हणजे मिठाई तय्यार करणाऱ्या पासून, ट्रे हाताळणाऱ्या पर्यंत आणि बरेच ह्या सगळ्यांच्या नजरा नाही म्हटलं तरीही पडलेल्या असतातच. कोणाला कधी खावी / चाखावी वाटत असणार, कोणाला काही तर कोणाला आणखीनच काही. हा विश्वासाचा भाग आहे बरं का मंडळी. ह्या सगळ्यांचा इफेक्ट निघून जावा ह्या करताच मग प्रथम विकत आणलेली मिठाई देखील देवासमोर ठेवण्याची आणि हात जोडण्याची प्रथा आहे. तो काही सेवन करत नाहीच. पण आपलं त्याच्या समोर ठेवणं काम आहेच. अगदी महत्वाचं, माझ्या दृष्टीने.
अनेक आधुनिक संत म्हणतात कि बाहेरचं खाऊ नये, पण सगळ्यांनाच प्रत्येक वेळी जमेलच घरी करणं असं नाही. त्यामुळे पहिल्यांदा "त्याला" समर्पित करा ज्याने दिले आहे (डिश घरी केलेली किंवा विकत आणलेली) आणि मग शांतपणे सेवन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा