रविवार, २८ मार्च, २०२१

वैयक्तिकरण / Personalization

 आज मी बदल म्हणून एका मैत्रिणीकडून पुरणपोळी ऑर्डर केली. मागच्याच आठवड्यात एका  मैत्रिणीचे तोंड गोड करण्यासाठी (प्रमोशन झालं म्हणून) मी भरपूर पुरणपोळ्या घरी केल्या होत्या त्यामुळे आज बाहेरून मागवल्या अर्थात घरीच केलेल्या. 

डन्झो केल्यामुळे आणि शिस्त म्हणून कदाचित त्या पाकिटावर माझे नाव लिहिले होते. माझ्या लेकीने वाढतांना बघितले कि आत सुद्धा एक रंगबिरंगी चिट्ठी होती त्यावर 

"सर्वांना होळीच्या गो शुभेच्छा..." असं लिहिलं होत सुवाच्य अक्षरात. 

सहीच नाही का? 

काय भन्नाट वाटलं म्हणून सांगते. जबरदस्त विचार आणि कृती सुद्धा. 

इतक्या सगळ्या व्यापात अशी छोटीशी कृती करण्यास वेळ काढणे म्हणजे काय बोलायचं. तशी काही गरज नव्हतीच पण अगदी अचानक चिट्ठी बघितल्यामुळे झालेला आनंद इथे ताबडतोब नमूद करावासा वाटला. 

हो हो अर्थातच मंडळी, तिला हि कळवलं न. 

आणि माझ्या मुलांना पण एक नवीन छोटीशी गोष्ट शिकायला मिळाली. 

वैयक्तिकरण / Personalization म्हणतात ह्याला.  

Hats off to Asmita's "Time Management" indeed.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...