आपण अनेकदा तहान भागवण्यासाठी म्हणून, किंवा सहज गम्मत म्हणून देखील थंड पेयाची बाटली विकत घेतो. अनेक वेळा थंड पेयाची उत्कृष्ट जाहिरात बघून देखील "एकदा चव घेऊया" असं म्हणून देखील विकत घेतली जातेच. हे प्रमाण तरुणांमधे जास्त असलं तरी सर्वत्रच बघायला मिळते. बहुतांशी त्यातलं चविष्ट पेय संपलं तरी ती बाटली राखून ठेवली जाते. ती छोटेखानी, रंगबिरंगी बाटली, अर्थात प्लॅस्टिकची पुन्हा वापरली जाते. कारण ती सोप्पी पडते सहज त्यात पाणी भरून न्यायला. ब्यागेत, पर्स मधे किंवा हातात धरून सहज आपल्यापुरतं पाणी नेता येत. तुम्ही पण अनेक ठिकाणी हे बघितलं असेलच. मला आज त्याच खरं कारण समजलं, उमगलं, म्हणून हा पंक्ती प्रपंच.
ते पेय संपल्यावर त्यात पाणी भरलं जातं. पहिले काही दिवस त्या पाण्याला पण पेयाचा सुगंध येतोच. म्हणजे घोट घेतांना क्षणभर असंच वाटून जातं कि आपण ते उत्कृष्ट पेयचं पीत आहोत. कित्ती भन्नाट ना? पितोय पाणी आणि वाटतंय गोड पेय, अहाहा. हा झाला एक अनुभव. त्या नंतर आपल्याला ती बाटली बघून मस्त वाटतं. दुसऱ्यांना पण बाटली बघून असं भासतं कि "काय मज्जा आहे त्याची, मस्त पेय पितोय" असं काहीसं. त्यामुळे मग ती बाटली अनेक दिवस, महिने, हारावे पर्यंत वापरली जाते. हरवली कि मग दुसरे पेय विकत घेऊन, पियुन मग तो सिलसिला सुरूच राहतो. अनेकदा मी ऐकलं आहे, जर अगदीच कोणाला पाणी प्यायची ईच्छा झाली आणि त्याने तुमच्याकडे पाणी मागितलं, तुम्ही हि अशी रंगीत बाटली दिली कि ते लगेच म्हणतातच, "मी पाणी मागितलं हे पेय नाही, पाणी नाही आहे का?" ई. मज्जा आहे कि नाही, कसं फसलं जातं बघा.
अश्या सगळ्या फसव्या प्रकाराला सोडा आणि एक तुमची अशी पाण्याची बाटली चांगल्या कंपनीने तय्यार केलेली विकत घ्या आणि त्यातून पाणी प्या. हे असलं विकतचे दुखणे नकोच. खरं तर पेयांची बाटली ते संपलं कि व्यवस्थित फेकून द्यायची असते, रि-सायकल करायला दिली पाहिजे, पण नाही, नसता चिकटपणा. फुशारकी वगैरे मारू नका कि मी कित्ती मस्त मस्त पेय पितो हे अजिबात दाखवायला जाऊ नका, आणि पेय जमली तर विकतची पिणं टाळाच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा