आताशा जरा सगळंच वेगळं झालंय पण माझ्या छोटेपणी किंवा त्या आधी खूप मस्त आणि वेगळंच होतं. प्रत्येक समारंभानुसार पेहेराव असायचा. शिवाय पेहेरावावरून माणूस पण ओळखला जायचा. लहान, थोर, मोठे, आणि शिवाय उपजीविकेच्या साधनांनुसार पण पोशाख बदल होत असे, साहजिकच. प्रत्येक जण आपली पायरी ओळखून असायचा आणि वागायचा देखील. का कुणास ठाऊक पण मी त्या वातावरणात मोठी झाले, वावरले त्यामुळे असेल कदाचित ते मला जास्त भावले. मुजोर नव्हते कोणीच तेव्हा. असो. तर जरीकाठाची साडी हिला एक खास स्थान होते, जगावेगळे महत्व होते. त्या वेळी माझ्या आजी आणि आईच्या काही ठराविक जरीच्या साड्या अस्सल सोन्याच्या धाग्यांनी मढवलेल्या असायच्या. क्या बात है नाही. अहाहा च. अर्थात त्या वेळी सुरक्षितता तर होतीच शिवाय अदब होता, वेगळाच सन्मान, अभिमान आणि जाणीव होती. जरीच्या साड्या ह्या खास सणाला, पूजेला, प्रसंगांना च नेसल्या जायच्या. त्या जरीच्या साड्या देखील ह्या मुलींची, आई बहिणींची वाट बघत असतील, असं काहीसं होतं तेव्हा. जितका मान त्या पूजेला आणि घरच्या स्त्रीला, तेवढाच सन्मान ह्या जरीच्या साड्यांना देखील होता. पिढ्यानं पिढ्या टिकतील अश्या दर्जाच्या त्या साड्या असायच्या. आजी, आईची साडी च खरं तर पहिली साडीची ओळख असायची नवतरुण मुलीला, काय वेगळीच उब असायची त्यात, प्रेम आणि आशीर्वाद तर भरभरून, ओथंबून वाहात असतं. एक वेगळीच प्रथा होती ती, त्या काळी. आणि आताशा वेगळंच सगळं उभं ठाकलंय ह्याच माझ्या डोळ्या समोर. आताशा उठसुठ घर कामाला येणाऱ्या बायका पण भरजरी साड्या नेसून येतांना दिसतात. कुठे गेला तो त्या जरीचा मान सन्मान? कोणी दिल्या असतील जरी तरी सणवारीच उत्तम दिसतात त्या नेसलेल्या. एक वेगळा उत्साह भिनतो जरीची साडी म्हटली कि, वेगळाच एक माहोल तय्यार होतो, कामाचा वेग पण त्यामुळे एक तर थबकतो किंवा वाढतो, वयानुसार किंवा स्थितीनुसार किंचित त्यात बदल घडतात. पण जरीची साडी म्हणजे पूजा, समारंभ हे समीकरण आता पूर्णपणे बदलेले दिसतंय. "ती" चा तो एक वेगळा ठसा जरा पुसट होतोय असं मला जाणवलं. "ती" ने अनेक टप्प्यातून प्रवास केलेला पण आढळला मला, सोनं ते प्लास्टिक ची जरी हे "ती" च्या साठी पण सोप्प नसणारच. प्रत्येकाला सजायची मुभा आहेच पण जरा तो दंभ बाजूला सारायला हवा, आनंदी राहायला हवं, "त्या" खास जरीचे उत्कृष्ट गूण अंगिकारायला काय हरकत आहे? साधी साडी, दररोज ची साडी, कोणी भेट म्हणून किंवा स्वतः विकत घेतली जरीची साडी ह्या सर्वांमध्ये निश्चित फरक आहे आणि तो जगण्यात एक वेगळीच मज्जा आहे. "ती" च्या मुळे एक वेगळाच साज चढतो, तो अनुभवा, तो जगा आणि बघा फरक, दिवस एका वेगळ्या ऊर्जेने सुरु होईल आणि ती टिकेल दिवसभराच्या कामात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा