अनोखा दागिना
काळ्या वर हिरव्याच्या छटा आणि अनोख्या पद्धतीने गुंफलेल्या वेली
आणि दर दिवशी वेगळ्या छटा वैविध्य आकाराचे प्रकारचे दागिने
इतका बदल, इतकी रेंज
अहाहा
अप्रतिमच
मला तर ते दृश्य बघून अनेकदा हेवा वाटतो त्यांचा
इतकं सुरेख, आखीव रेखीव कलर कॉम्बिनेशन असतं ना, ज्याचं नाव ते.
सांगा बघू काय म्हणायचं आहे मला?
बरोबर ओळखलंत मंडळी.
२०१३ पासून न चुकता बहुतांशी रोजच कसं काय समजत त्यांना माहित नाही पण आमची ऑफिस ची बस सुटली कि ह्यांनी छोटासा रस्ता अडवलाच म्हणून समजा. एकतर आमच्या बस ची खासियत म्हणजे ती दररोज उशिरा निघायची, ह्याची त्याची वाट बघत, भूका लागलेल्या असायच्या आणि मार्ग नसायचा. आधी किंचित राग यायचा आम्हाला पण मग मज्जा येऊ लागली, कारण ते दृश्यच भव्यदिव्य असायचं, वेगळं असायचं. मला तरी आनंद होत असे, होतो अजूनही.
शेवटी काय रस्ता त्यांचाच तर आहे हो, आमच्या आधी, त्यामुळे त्यांचा हक्क जास्त. त्यात आमचे ड्राइवर काका कधी म्हणजे कधी हॉर्न वाजवणार नाहीतच, शांत पणे बस थांबवणार.
भव्य दिव्य म्हशी ताई आणि त्यांच्या शिंगावर आरूढ झालेले वेल, दररोज च आहे हे दृश्य, दररोज बदलेले वेल, मोठे लहान, विविध पानांच्या आकाराचे, आणि स्थिर त्या शिंगांवर, आणि त्यात ती भारदस्त डौलदार चाल, गळ्यातली घंटा.... आणि त्यांना पण माहित असत ते कि आपण खूप छान दिसतोय ते, त्या पण मग मिरवतात आमच्या समोर, अहाहा.
निसर्गाची पण कमाल आहे नाही, आपोआप सौंदर्याच्या गोष्टी बहाल करतात. कित्ती काळजी त्या म्हैस ताईची. मला तर कित्ती लिहू आणि कित्ती नाही असं झालंय. निसर्ग आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर अन-सीझनल / अवेळी / गरज नसतांना दागिने कोण घालणार म्हशी ताईंना नाहीतर.
कित्ती शिकण्यासारखं आहे नाही ह्या सगळ्यांकडून सतत. अपेक्षा विरहित कार्य सातत्याने सुरु ठेवा, दुसऱ्यांना सजवत राहा सहज.
#Ornaments #NaturalOrnaments #Buffalo #BuffaloHornsWithTreeBranch #AntlersWithTreeBranch #Antlers&Climber #Black&Green #AwesomeCombo #ColorCombination #Giving #Unseasonal #Beauty
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा