सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

बुलेट एक शान

माझ्या मोठ्या भावाकडे बुलेट आहे. माझ्या लहानपणापासून मी हे बघितलं आहे आणि ते माझ्या मनात पक्कं ठाण मांडून बसलं आहे कि बुलेट हि शान आहे, पोलिसांची, उंच पुऱ्या तगड्या / रांगड्या व्यक्तिमत्वाची. आणि मी आजची बुलेट म्हणत नाही आहे, त्या काळाची, जबरदस्त, ट्रूली हेवी, आणि दुरून च धक-धक ऐकू येणारी अशी. माझी आई हत्ती म्हणायची त्या बुलेटला. पेर्सोनालिटी हवी बुलेट चालवायची म्हणजे माझ्या दृष्टीने. बुलेट चालवणारा म्हणजे दिलाच माणूस, जिगर असेलेला च, पुढे बोलायलाच नको. बास. 


अजुन एक बुलेट ची छोटीशी आठवण मी जेव्हा कॉलेज मधे होते आणि गाडी चालवत होते तेव्हाची. एकदाच मी माझी गाडी थांबवली ट्रॅफिक सिग्नल वर पहिल्यांदा. माझा नियम होता कि एकतर सिग्नल असलेल्या रस्त्यावर गाडी चालवायची च  नाही आणि जावं लागलंच तर गाडी कधीच थांबणार नाही, सुसाट निघालं घरुन कि डेस्टिनेशन वरच थांबायचं. असो. असच एकदा मला ध्यानात आलं कि एका ट्रॅफिक सिग्नल वर एक तरुण पोलीस उभा असतो, दररोज. एक दोन दिवस बघितलं मी त्याला. माझ्या नजरेत तो आला कारण त्याच्या कडे फडतूस एक छोटीशी मोटरसायकल होती, बुलेट नाही. बास, थांबले आणि डायरेक्ट जाऊन विचारलं, "तुम्ही पोलिस इन्स्पेक्टर ना, मग बुलेट का नाही तुमच्याकडे...". तो बिचारा काय बोलणार. 

 
लहानपणी मी ऐकलेलं आठवतंय काही टोळकी भयानक खोडकर. बऱ्याचदा लोकांच्या गाडीच्या सायलेन्सर मधे कागद घुसवायचा. मग काय, बिच्चारा मारतोय किका, पण कसली सुरु होतेय ती गाडी. आणि झालीच तर मग भसाडा आवाज करत सुरु व्हायची.

अजून एक कारण असतांना गाडीच्या सायलेन्सरला खोकला व्हायचा आणि ते कारण म्हणजे कार्बोरेटर मधला / पेट्रोल मधला कचरा. ई.

पण आजकाल तर बुलेट म्हणजे एक खेळणं झालाय. जो उठतो तो बुलेट चालवतो. किडकिडीत शरीरयष्टी असलेले, पोलिसात वगैरे नसतांना उगाचच बुलेट घेऊन आणि मुद्दाम काहीतरी सायलेन्सर मधून आवाज काढून चालवतात. कुत्रा दिसला काढ आवाज, मुलगी दिसली काढ आवाज. उगाचच शान मारायची. आणि तो आवाज एवढा मोठा आणि भसाडा कि एकदम क्षणभर हृदयाचे ठोके बंद होतात. एक तर बुलेट त्यांनी कमावलेली नाही, फुकटच्या पैशानी घेतलेली, त्यात कामधंदे नाहीच. मग ज्यांना काम आहे, जे एखाद्या उद्देशाने किंवा शांत पणे रस्त्यावरुन चालले आहेत, मुके जनावर ई. त्यांना का त्रास द्यायचा. काय मिळत असं करून? माझे हात कधी कधी इतके सळसळता ना, असं वाटत एक द्यावी, पण अश्या युजलेस मुलांना काय समजणार, दिसतच आहे काय दिवे लावतातय ते. बुलेट आताशा शान राहिलेली नाही हेच खरं.  असो. 

#EnfieldBullet #RoyalEnfield #Status #VeryHeavy #BreathTakingPiece #StrongPersonToy #PoliceVehicle #

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...