सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

अमुल्य भेट

"शिक्षक दिनाची" अमूल्य भेट मिळाली मला मागल्या वर्षी आणि ह्या वर्षी देखील. दोन्ही वर्षी दोन वेगवेगळ्या गिफ्ट्स होत्या आणि अनोख्या देखील. ह्या व्यतिरिक्त आणि ह्या पेक्षा सुंदर / वाखाणण्यासारखी दुसरी भेट वस्तू असूच शकत नाही माझ्या साठी. म्हणून हा छोटेखानी पंक्ती प्रपंच.

आमच्या आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठाने अनेक वर्षांपासून भरपूर संशोधन आर्टिकल्स असलेले डेटा बेस घेतले आहेत आणि सर्वांना उपलब्ध पण करून दिले आहेत. ह्या डेटा बेस चा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि वर्गात शिकवण्याची प्रोसेस इंटरेस्टिंग व्हावी ह्या करता एक स्पर्धा आयोजित केली जाते दरवर्षी. २०१८-१९ दरम्यान मी हे डेटा बेस वापरून स्मार्ट पद्धतीने संशोधन आर्टिकल्स / पेपर्स कसे लिहिता येतील हे शोधून काढलं, अर्थातच माझ्या PhD विद्यार्थ्यांसोबत. त्यानंतर वर्षभर सर्वत्र त्याचे हॅन्ड्स ऑन वर्कशॉप्स घेतले आणि सर्वांनाच त्याचा खूप फायदा झाला. त्यांचा उत्साह वृद्धिंगत झाला, त्यांना आवड निर्माण झाली संशोधन करण्यात आणि आम्हाला सर्वांना एक वेगळंच समाधान लाभलं. मग आम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकली सुद्धा. मागल्या वर्षी AICTE च्या प्रमुखांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं. 

गतवर्षीच्या विजेत्याला पुढील वर्षी परीक्षक म्हणून बोलवायची पद्धत आहे आमच्या विश्वविद्यालयात, ह्या स्पर्धे करता. त्यामुळेच ह्या वर्षी मला परीक्षक म्हणून आमंत्रण देण्यात आलं. अहाहा. काय वाटलंय मला म्हणून सांगते. परीक्षक होऊन दुसऱ्याने केलेले कार्य, डेटा बेस चा उपयोग आणि विद्यार्थ्यांचा कल ह्या नवीन प्रयोग बद्दल ई. तपासणे आणि ते देखील शिक्षक दिना दिवशी ह्या पेक्षा मोठं शिक्षक दिनाचं बक्षीस काय असणार सांगा. 

दरवर्षी स्वहस्ते विद्यार्थ्यांनी केलेले शुभेच्छा पत्र, आताशा सोशल मिडिया वर आलेले संदेश ई. आठवणी आहेतच टीचर्स डे च्या पण ह्या मागच्या दोन वर्षातील काही वेगळ्याच गिफ्ट्स आहेत आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावर काही उरला नाही. 

"असे इव्हेंट्स होती आणि स्मृती ठेवुनी जाती". 

जगभरातल्या सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. 

आणि प्रत्येक वेळी, दर दिवशी मी सर्वांकडून काही ना काही सतत शिकत असतेच, त्या सर्व गुरूंना पण वंदन.

#TeachersDay #ResearchArticlesDatabase #Scopus #WebOfScience #BestUseOfE-Resources #EventForFaculties #HandsOnWorkshops #BibliometricPapers #SurveyPapers #ReviewPapers


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...