माझी आई काय, मावश्या काय किंवा आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्याच जणी नेहेमी एक गोष्ट सांगायच्या आणि ती म्हणजे कडधान्यांचे महत्व. त्याशिवाय वाळवलेल्या वड्यांचे प्रत्येक घरातील उच्च स्थान ई. मी फक्त ह्या सगळ्याकडे बदल म्हणून बघत असे, कि अरे वा छान, आज उसळ तर जेवायला, किंवा कशातही सहज सामावतील अश्या त्या वड्या. उत्कृष्ट चव यायची आणि मज्जा सुद्धा ह्या अश्या प्रकारच्या भाज्या सेवन करतांना. शिवाय पौष्टिक हि भरपूर, कारण त्या वेळी ह्या उन्हात वाळवत असत कडधान्य आणि वड्या. त्यामुळे सूर्याची किरणे थेट त्यात सामावलेली असायची.
सध्या मी नवीन कचेरीत आहे आणि दररोज माझा खानसामा मला डब्बा देतो. अर्थातच हे सगळं मी पहिल्यांदा अनुभवत असल्यामुळे आणि सगळ्याच चवी आवडत असल्यामुळे "ओम नमः शिवाय". तो देईल ते खाते आणि अर्थातच खूप कौतुकाने, कारण आज जेवायला, नाश्त्याला काय करायचं हे मी नाही पण तो ठरवतो आणि दररोजचा डब्बा उघडणं म्हणजे वेगळं सरप्राईझ असतं मला. माझ्या लहानपणी आई शाळेत जातांना डब्बा देत असे आणि तो थेट शाळेतच मधल्या सुट्टीत उघडला जायचा आणि जे मोठं सरप्राईझ मिळायचं म्हणून सांगते. साधं पण भन्नाट. एक वेगळंच उत्साही वाटतं जे शब्दात गुंफण फारच अवघड आणि अशक्य, दररोज जेव्हा मी डब्बा उघडते, आणि त्यातले जिन्नस बघते तेव्हा. पण एक गोष्ट हळूहळू मला उमगली ती म्हणजे त्याचं रुटीन, तो काय देतो आणि आज काय असू शकत डब्ब्यात आता ते सहज समजायला लागलं आहे.
माझी आई, काकू आणि इतर जणी तेव्हा त्या वेळी जेव्हा साधे फोन देखील नव्हते घरी तेव्हा पाहुणे आले कि अश्या वड्या घातलेली भाजी किंवा उसळी करायच्या, किंवा अगदी भाज्या मिळाल्या नाहीत, पावसाळ्यात किंवा कंटाळा आला कि ह्या कोरड्या गोष्टी म्हणजे रामबाण इलाज. बाहेरून मागवणे ई. त्या काळी माहितच नव्हतं. त्यामुळे ह्या पट्टाकिनी होणाऱ्या पौष्टिक भाज्या अत्यंत आवडायच्या तेव्हा. माझं हे निरीक्षण आहे त्या खानसाम्याबद्दल कि तो रोज सकाळी न चुकता उसळी देतो आणि संध्याकाळी भाजी. सकाळी बिचाऱ्याला नाश्ता केल्यावर एक तर जीवावर येत असावं भाजी चिरणं किंवा एकट्यालाच कंटाळा येत असावा. पण कित्ती हुषार आणि स्मार्ट आहे पहा, संध्याकाळी एकदाच भाजी चिरण्याचे कष्ट घेतो तो. बाकी वेळी एक मोठा डब्बा भरून मसाला करून ठेवलेला दिसतो पठ्याने, बास उसळी शिजवतो आणि घालतो मसाल्यात. झालं झट कि पट भाजी तय्यार. सहसा घरी वापरात आणलेला प्रकार / क्लुप्ती आता मला इथे पाहिला मिळाली म्हटलं लिहावं. मला तर फारच आवडला हा स्मार्ट खानसामा जो काम पण करतो आणि आमच्या सगळ्यांच्या स्वास्थ्याची काळजी देखील रोज सकाळी उसळी खाऊ घालून. "एका दगडात अनेक ........".
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
स्मार्ट खानसामा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा