मी कधीही म्हणजे कधीही विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितलं नाहीच आज पर्यंत. मला उंचीची भयंकर भीती वाटते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझी मुलाचं बसायची विमानाच्या खिडकीत आळीपाळीने त्यामुळे पण बाहेर डोकावलं जायचं नाहीच. पण काल विमान प्रवासात का कोणास ठाऊक पण बाहेर बघितलंच आणि काय आश्चर्य "माझी ना मी राहिले", असा काहीसा अनुभव आला मला.
त्यात भरीस भर म्हणजे मी माझ्या नागपूरला निघाले होते, माझ्या मुलांच्या मामाच्या गावाला. आणि ती ढगांची शोभा, ते ढगांचे वैविध्य आकार, रंग, छटा आणि सगळे निसर्ग रूप बघून इतकी भारावून गेले कि मला काहीही सुचत नव्हतच.
त्यात थोडक्यात मला काही शब्द पेरता आले ते असे, जे "झुकू झुकू अगीन गाडी..." ह्या सुप्रसिद्ध कवितेवर आधारित आहे. मला विमानातून बघतांना आलेले आणि नागपूरला इतक्या वर्षांनी जाते आहे ह्या भावनेची थोडक्यात कोशिंबीर आहे हि, गोड मानून घ्या.
हवेशी बोलत विमान चाली
ढगांच्या गर्दीतून वाट काढी
कापसाचे ढग पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या
मामाच गाव मोठा
प्लॅटिनम चांदीच्या पेठा (ढगांच्या विविध छटा)
शोभा पाहून घेऊया
मामाच गाव मोठा
ढगांच्या विविध पेठा
शोभा पाहून आनंदी होऊ या
मामाच्या गावी सगळेच सुगरण
हल्दीरामचे अख्खे दुकान
पुडाची वडी फस्त करू या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा