माझ्या लहानपणी पासून ते काही दिवसांआधी पर्यंत मला न एक कदाचित चुकीचा गैरसमज झाला होता. माझ्या बरोबर / माझ्या समोर अनेकदा "साधे नागरिक / सिव्हिलिअन्स" असल्यामुळे खूप काही चांगली वागणूक मिळाली नव्हती. कारण जे सैन्यात किंवा आरमारात काम करतात, देशासाठी काही तरी करतात ते च फक्त बहुउपयोगी असतात, बाकी नाही, त्यामुळे. सिव्हिलिअन्स ना शिस्त माहित नसते, वागत नीट येत नाही ई. ई. त्यामुळे मी बहुतांशी आणि आदरपूर्वक आरमारात काम करणाऱ्या / केलेल्या लोकांशी जरा चार हात दूरच राहत असे नेहेमीच.
पण मग काही वर्षांनंतर चांगले अनुभव पण आले पण अगदीच एक्का-दुक्का आणि त्यामुळे त्यांच्या वर भरोसा ठेवायचा कि नाही असं किंचित डोक्यात आलं सुद्धा. असो. पण गेले चार-पाच दिवस हवाईदलातल्या निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांनी "तुम्ही साध्या सिव्हिलिअन तर आहात..." अश्या पद्धतीचे उद्गार काढले नाहीत, तसं भासवलं पण नाही आणि शिवाय मला नागपूरच्या नवीन कचेरीत सेटल होण्याकरता प्रचंड मदत पण करत आहेत आणि खात्री आहे कि करत राहतील. अगदी बारीकसारीक गोष्टींकडे जातीने लक्ष देऊन माझं स्वागत करण्यात आलं. खात्री आहे कि ते सर्वांसाठीच असंच सगळं करत असतीलच. माझ्या प्रत्येक पिटुकल्या प्रश्नाला ताबडतोब उत्तर मिळालं आणि येण्याच्या आधीच मी पुन्हा एकदा नागपूरकर झाले अगदी कंफोर्टटेबली ते सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम मुळेच. खरंच, जेव्हा ते हवाई दलात अधिकारी होते तेव्हा देखील आणि आता वागण्यात / बोलण्यात देखील असे "मोठे व्यक्तिमत्व". खूप खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्या कडून आणि इतकी रिस्पेक्ट / आदर पण दिला जातो पदोपदी हे वाखाणण्यासारखं आहे, म्हणून हा खास पंक्ती प्रपंच. आधी व्यक्ती भन्नाट हवी मग ती कोठेही आणि कोणासाठीही का ना काम करेना. सिव्हिलिअन्स म्हणून ह्या नंतर कधीही काहीही ऐकायला मिळणार नाही मला किंवा बाकीच्यांना जर असे अनोखे व्यक्तिमत्व असेल तर.
"असे अधिकारी येति आणिक स्मृती ठेवुनी जाती".
जीवेत शरद: शतम् शतम्...
सुदिनं सुदिनं जन्मदिनम्,
भवतु मंगलम् विजयीभव सर्वदा,जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा:!
चिरंजीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुने !
रुपवान्वित्तवांश्चैव श्रिया युक्तश्च सर्वदा ! १ !
मार्कण्डेय नमस्तेस्तु सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं प्रसीद भगवन्मुने ! २ !
चिरंजीवी यथा त्वं तु मुनिनां प्रवरो द्विज !
कुरुष्व मुनीशार्दुल तथा मां चिरजीविनम ! ३ !
मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं अस्माकं वरदो भव ! ४ !
जय देवि जगन्मातर्जगदानन्दकारिणि !
प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठीदेवते !५!
त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च !
ब्रह्माविष्णुशिवै:सार्थं रक्षां कुर्वन्तु तानि मे ! ६ !
The apt and crisp meaning of these beautiful wishes are explained on this blog site. https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118182.html?1161309045
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा