बहुतांशी संध्याकाळी रोज कचेरीतुन घरी आल्यावर मुलांशी गप्पा झाल्यावर, संध्याकाळी रात्री काय जेवायला करायचं हे ठरलं कि मग मला थोडासा रिकामा वेळ मिळतो. त्या वेळी किंवा कधीतरी रात्री मी एक हास्यावर आधारित मराठीतला कार्यक्रम ऐकते. माझे डोळे दमले नसतील तर बघते देखील. तर एक फार प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि त्यात एक सुविख्यात पात्र आहे. तो तरुण आहे, पिळदार शरीरयष्टी आहे, उंच आहे, डोक्यावर भलं मोठं टोपलं आहे आणि टीव्ही वर च्या कार्यक्रमात आहे म्हणजे तो एक उत्कृष्ट जाणकार कलाकार आहे. बरोबर?
तुम्हाला कदाचित वाटत असेल कि हि म्हणजे मी ह्या कलाकाराचे एवढे वर्णन का करत आहे. त्याच महत्वाचं कारण म्हणजे त्याचा एक डोळा वेगळा आहे / दुखावला गेला आहे. डोळ्यात किंचितसा दोश असून देखील त्याचे एवढे फॅन फोलोवेर्स आहेत, कसे काय बुवा? ह्याच उत्तर एकच "थांबला तो संपला". पुढे चालत राहणं महत्वाचं, सातत्याने. सगळं बरोबर घेऊन, ऍबिलिटीज आणि डिसॅबिलिटीज सुद्धा. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना, मग दोन्ही एकदम चालू राहायला हव्यातच नाही का, समांतर पद्धतीने. डिसॅबिलिटीज ना त्यांचं काम करू द्या, तुम्ही ऍबिलिटीज ना घेऊन हसत खेळत चालत राहा, कार्यरत राहा. ह्या कलाकाराने पण हेच केलं आहे, त्यामुळेच तर तो आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मला तर फारच आवडतो / भावतो तो. अर्थात ह्या आधी सुद्धा खूप कलाकार होऊन गेलेत त्यांच्या मधे सुद्धा लोकांना उणिवा भासल्या / आढळल्या पण ते देखील कधीच थांबले नाहीत. डिसॅबिलिटीज चा स्वीकार करा, मान्य करा कि आपण अनोखे आहोत, मार्गक्रम करता करता डिसॅबिलिटीज कधी ऍबिलिटीज विथ मेंटल स्टॅबिलिटी प्लस डूराबिलिटी होऊन जातील हे तुम्हाला समजणार पण नाही. डिसॅबिलिटीज ह्या फिचर चा विजय असो.
#abilities #disabilities #stability #MentalStability #MoveOn #NeverStop #ParallelPaths
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा