आमच्या घराच्या अगदी पाठीमागे एक वॉचमन च कुटुंब राहतं. त्यांना एक अतिशय गोंडस मुलगी आहे. साधारण ८ महिन्यांची असेल. मागे एकदा मी तिच्या बद्दल सुतवाच्च केलं पण होत. फक्त चार पत्रे कसे तरी उभे केलेले हे त्यांचं घर. त्यात आई, बाबा, ती, आजी आणि काका इतके जण राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर एक जुना मोडलेला सोफा आहे, असाच आणून ठेवलेला. त्यावर आजी सकाळी उठल्या कि बसल्या असतात आणि काही तासातच आडव्या होतात. मी तीच नाव झाशीची राणी ठेवलं आहे. ती आजी जवळ बसलेली असते. ठेकेदाराने जसे काही हिलाच लक्ष द्यायला सांगितले आहे सगळीकडे अशी प्रत्येक येणा जाणाऱ्याला आवाज देत असते वैविध्य पद्धतीने, खणखणीत आवाजात. बाप रे. इतका मोठ्ठा आवाज आहे तिचा कि ज्याचं नाव ते. पहाटे पासून भन्नाट दिवस सुरु होतो माझा त्यामुळे.
आता हे वाचल्यावर तुम्ही म्हणाल त्यात काय नवल, सगळी मुलं करतात हे सगळं. पण नाही मंडळी. माझ्या झाशीच्या राणीला कुठलेही खेळणी नाही आहेत खेळायला मोटर स्किल्स विकास आणि वाढ व्हायला. कोणालाही म्हणजे कोणालाही वेळ आणि आवड नाही तिच्याशी बोलत बसायला. आई घरच्या कामात बुडालेली, बाबा बाहेरच आणि वॉचमन च काम, काका दुसरी कडे जातो कामाला आणि आजी बहुतांशी शांत. मग तरीदेखील इतकी भर्रकन प्रगती म्हणजे दाही बोट तोंडात च. फारच वाखाणण्यासारखी आहे. तिच्या ह्या टप्प्या टप्प्याने होणाऱ्या गोंडस वाढीचे कौतुक, अगदी मान धरण्यापासून जे छोटे छोटे टप्पे तिने ज्या गतीने गाठले त्याची मी दररोजची साक्षीदार आहे. खूपच अप्रतिम प्रतिसाद मिळत गेले आणि मिळतात तिच्या कडून, असं वाटत सतत खेळत बसावं तिच्याशी. रडणं तर माहीतच नाही पठ्ठीला.
असं बरेचदा आढळलं आहे कि काही समृद्ध घरातली बाळ नाही करत प्रगती सगळं जागच्या जागी असून देखील. अर्थात कधीच कोणाशी तुलना होऊच शकत नाही. पण तरीही ह्या माझ्या झाशीच्या राणीच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काय अप्रतिम मैत्रीण, शेजारी आणि उत्साही व्यक्तिमत्व पाठवलंय माझ्या जवळ राहायला. तिचा आवाज ऐकला कि सगळा शीण तर निघून जातोच शिवाय उत्साह मिळतो तो वेगळाच. अहाहा.
#baby #babygirl #girlchild #growth #phases #brilliantgrowth #respondstoothers #uniquequality #bestfriend #queenofJhasi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा