सर्वात प्रथम म्हणजे संशोधन करणंच फार आव्हानात्मक, त्यात दुसऱ्याकडून संशोधन करून घेणे त्याहून पुढची पायरी (माझ्या गाईड ने कसं केलं कोणास ठाऊक, देवा) आणि त्यात जर विद्यार्थी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) चा माजी विद्यार्थी असेल तर? मग तर गाईड थोडासा मागे पडतोच. अगदी तस्से झाले माझ्या बाबतीत. मी काय ते साध्या संस्थेमधुन शिक्षण घेतलेली एक साधी मुलगी. त्यात गाईड झालेली ते हि भारतीय तंत्रज्ञान संस्था मधून शिक्षण घेतलेल्या आणि स्वतः अनेक वर्ष शिक्षक असलेल्या व्यक्ती ची. प्रचंड मेहेनती, वेळेआधी काम, कधीही कशासाठी पण "नाही" हा शब्द नाही, आणि आवड संशोधनाची. पूर्णवेळ नोकरी सांभाळून, घराकडे लक्ष देऊन, आईबाबांची काळजी घेऊन शिवाय PhD करणं फारच आव्हानात्मक होत. पण त्यांनी ते निभावलं आणि पूर्ण केलं.
असे उत्कृष्ट काम करणारे आणि संशोधनात गोडी असणारे विद्यार्थी सर्वांना लाभो हि प्रार्थना. Kudos to Dr. Rahul Joshi Sir.
अश्या प्रकारे ह्या २०२१ साली बाप्पाच्या कृपेने दोन अभ्यासकांची विद्यावाचस्पती पदवी संपूर्ण झाली, बहाल झाली. मला गाईड ह्या शब्दाचा अर्थ प्रकर्षाने समाजाला. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" हे कित्ती पटीने खरं आहे हे पण समजलं.
#PhD #research #IIT #researchArticles #beforetime #sincere #neversaidno
Khup chhan lihil ahe. Congratulations to you and Rahul sir 💐
उत्तर द्याहटवाThank you so much Shraddha mam, really appreciate your words.
उत्तर द्याहटवा