मराठीत तर बघण्यात आलं नाही पण इंग्लिश मधे आहे बऱ्याच ठिकाणी "हॅप्पीनेस इज...". असे इंग्लिश मधे पूर्ण झालेले आणि केलेलं वाक्य खूप वाचण्यात आलेत माझ्या ह्या आधी. पण एवढ्यातच मला सुखाची परिभाषा नव्याने समजली / उमगली, समोर उभी ठाकली.
त्याच असं झालं कि गेले तीन एक दिवस मी आमच्या नागपूरच्या नवीन कॅम्पस मधे रुळली आहे, नवीन कॉलेज स्थापन करण्यास हातभार म्हणून. मी येथे पाहुणी असल्यामुळे मला दररोज सकाळी अगदी गरमागरम नाश्ता, दुपारी आणि रात्री जेवण आणि त्यात पराकोटीची विविधता, न सांगता, न मागता. मी निःशब्दच झाले. अनेक दिवस आयतं हातात म्हणजे सोन्याहून पिवळे नाही का. समस्त समर्थ स्त्री जातील प्रकर्षाने कळेल मला काय म्हणायचं आहे ते, निश्चितच.
एक अनुभव सांगते. मी माहेरी येणार म्हटलं कि आई, बाबा, दादा सगळे म्हणजे सगळे इतके कामाला लागायचे ना, काय काय करू आणि काय नाही असं व्हायचं त्यांना. थोडे दिवसात भरभरून सगळं द्यायचं असायचं त्यांना, मला. खायला, प्यायला, सरप्राईझ, गिफ्ट्स आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी, मी येण्याच्या आधी पासून जय्यत तय्यारी सुरु झालेली असायची त्यांची. सतत मागे पुढे, मी काय काय छान करत होते, करते हे सांगतांना कधीच दमले नाहीत ते. माझ्या आधी त्यांना माहित असायचं मला काय हवं आहे, आवडत ते. माहेरी गेल्याचे सगळे दिवस उभे ठाकले माझ्या समोर आज आणि ते इतके प्रखर आहेत कि मला सध्या स्क्रीन पण दिसत नाही आहे टाईप करतांना एवढे डोळे डबडबलेत.
का?
माहेरीच आल्याचा भास होतो आहे मला मागल्या ३-४ दिवसांपासून. काही म्हणजे काहीच बघावं लागत नाही आहे.
प्रत्येक दिवशी नाश्ता आणि दोनदा स्वयंपाक काय करायचं हा यक्ष प्रश्न असतो रोजचा, कारण ह्याला ते आवडत तर त्याला नाही, डोक्याचा भुगा होतो नुसता. आणि आता मला काहीच ठरवायचं नाही, किंबहुना हातात ताट, वा वा. "सुख म्हणजे नक्की काय असतं?". बरीच सुख येतात आयुष्यात पण माहेरी जाण्याच्या सुखाची तुलना कोणाशीच कधीच होऊच शकत नाही. "माहेरपण देगा देवा".
का इतकं कौतुक असतं मुलीचं, तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं, तिच्या मित्र मैत्रिणीचं, मुलांचं, तिच्या आई वडिलांना नेहेमीच? कदाचित सुखाची परिभाषा समजण्यासाठीच असेल.
OMG there is absolutely no single word for माहेर in English dictionary, see how unique this place is.
#Maher #MothersHouse #BirthPlace #HappinessIs
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा