मी बहुदा दोन अडीच वर्षांनी मागच्या आठवड्यात पहिल्यांदा विमानात प्रवास केला. ह्या गेल्या दोन वर्षात परिस्थिती पण वेगळी होती आणि गरज नसताना प्रवास टाळणं आवश्यक होत. त्यामुळे हा प्रवास माझ्या साठी फार वेगळा होता, प्रत्येक गोष्टीच अप्रुप वाटत होतं मला. लहान मुलाला फिरायला बाहेर नेल्यावर कसा तो भिरभिर सगळीकडे बघतो, सगळं त्याला टिपून घ्यायचं असतं, प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असतो अगदी तस्सेच झाले होते माझे, थोड्याफार फरकाने. मी ह्या आधी नॉर्मल दिवसांमधे अनेक वेळेला अनेक ठिकाणी विविध विमानातून प्रवास केला आहे. त्यावेळी अगदी विमानाची चाके उतरतांना जमिनीला टेकली रे टेकली कि सर्व प्रवासी ताबडतोब पटापट, अतिशय घाईत डोक्यावर च्या कप्यात ठेवलेले सामान काढत असतं, प्रत्येकाचे मोबाईल फोन घणघणणे सुरु होत असे आणि इतकी म्हणजे इतकी घाई कि जसे कि ह्यांना ताबडतोब दुसरे विमान गाठायचे आहे.
पण मागल्या आठवड्यात जो माझा विमान प्रवास होता तो वाखाणण्यासारखा होता. विमान ची चाक जमिनीला टेकली, विमान पूर्ण थांबलं, जागेवर जाऊन स्थानापन्न झालं, तरीदेखील कोणताही प्रवासी उठला देखील नाही जागेवरून. सामान काढणं तर फार दूरची गोष्ट. एक्का-दुक्का फोन वाजला, बास. मग माझी मलाच शंका आली, म्हटलं कुठल्या भलत्या देशात तर नेऊन उतरवलं तर नाही ना विमान?. का$$$$ही सांगता येत नाही आजकाल. पण मग आजूबाजूच्या काही लोकांच्या तोंडी "अबे-काबे" ऐकलं म्हटलं नाही, आपण नागपूरच्या प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी च उतरलो आहोत. हाश. जीवात जीव आला माझ्या. त्यानंतर पहिल्या काही जागी बसलेले च लोक उठून जाण्यास सांगण्यात आले आणि चक्क लोकांनी ते ऐकलं. भरपूर चिमटे काढले मी स्वतःला आणि संपूर्ण श्रेय त्या नवीन दिवसांना देऊन मोकळी झाले. काय काय शिकवून गेले हे नवीन दिवस आणि काय भन्नाट बदल घडवून आणलेत. वाखाणण्यासारखेच. इतका बदल, दृश्य बदल घडवून आणल्याबद्दल शतश: धन्यवाद.
दुसऱ्या देशाशी अजिबात तुलना नाहीच, पण हि अंगिकारलेली शिस्त सर्वांनी टिकवून ठेवावी हि नम्र विनंती म्हणजे कोणाचीच कधीच गैरसोय होणार नाही. अश्या वागण्याने, अशी सुरवात केल्याने प्रत्येकाची आणि ह्या देशाची भरभराट होण्यास कोणीच थांबवू शकणार नाही. सुगीचे आणि सोन्याचे दिवस पुन्हा लवकरच येणार ह्याची चिन्ह दिसू लागली आहेत मला. जे बात.
शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१
नवीन दिवसांची शिकवण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा