हा एक मराठीतला फारच खुसखुशीत शब्द आहे माझ्या साठी, कारण हा टोकाच्या दोन्ही अर्थानी वापरला जातो सहज. हातात बेड्या पडल्या म्हणजे शिक्षा झाली आणि तुरुंगवास पण भोगावा लागणार पण मग तो सुखद (लग्नाची बेडी) का तुरुंगवास म्हणजे दुःखद हे तो कसा वापरला आहे त्यावर ठरत. तुम्ही सर्वांनी जर नीट निरीक्षण केलं तर अगदी जन्मल्यापासून आपण विविध बेड्या अनुभवत असतोच, अगदी छोटेपणीच्या पायातल्या छुमछुम पासून. आणि त्या वेळी त्या बाळाला जास्त समजत नाही आणि शिवाय त्याच्या पायात बळ यावं, त्याला चालायला साथ मिळावी म्हणून मुलगा असो कि मुलगी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे पायातले अलंकार घातले जातातच त्या बाळाला. तिथपासून सुरु होतो हा बेड्यांचा प्रवास. मग मोठे पाणी खास करून मुलींना कमी आवाजाचे, फॅशन म्हणून अप्रतिम दिसणारे पैंजण लग्नापर्यंत आणि त्यानंतर देखील असतात. प्रत्येक वेगवेगळ्या बेड्यांचा शरीराला, वाढीला आणि प्रकृतीला प्रचंड उपयोग असतोच. आता हेच बघा ना गेले दोन वर्ष मी इतक्या वेगळ्या प्रकारच्या बेड्या घालते आहे कि ज्याचं नाव ते. पायात वजन बांधून व्यायाम उपयोगी असल्यामुळे मी घरी धान्य वापरून तय्यार केलेले वजन किंवा विकतचे वाळू + मॅग्नेट असलेले घालते. वाळू मुळे आणि त्या वरच्या प्लास्टिक सारख्या कापडामुळे जशी जशी मी व्यायाम करते तसे तसे संगीतमय वैविध्य बोल ऐकू येतात आणि जे मला भलतीच प्रेरणा देऊन जातात रोज आणि ठरवलेला व्यायाम करण्यास खूप मदत होते. ज्यानी कोणी हे वजन वाळू घालून डिसाइन केले आहे त्याला मनापासून धन्यवाद. अश्या देखील बेड्या असतील ह्या जगात हे मला अनभिन्यच आहे. मला माझ्या पायातले घातलेले छुमछुम लहानपणी आठवत नाहीत पण माझ्या मुलांच्या गोऱ्या गोमट्या पायातले छुमछुम आणि त्याच्या आवाजाचा मी सतत न कळत घेतलेला मागोवा, हे सगळं आज पुन्हा आठवलं आणि त्या अप्रतिम सुखाच्या दिवसांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. ज्यांनी ज्यांनी माझ्या पर्यंत हे बेडी रुपी वजन / वेट्स पोचोवले त्यांना मनापासून धन्यवाद. ह्या सगळ्या ची परतफेड होणे नव्हेच.
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१
बेड्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा