शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

बसलेला घसा

अहो काय सांगू तुम्हाला एका घश्याची गोष्ट. नेहेमीच साधा चालणार घसा वेगळा आणि थोडासा देखील बदल झाला तरी गडबड, त्या घसा-धारकासाठी आणि बाकीच्या ऐकणाऱ्यांसाठी देखील. ऐकणारे जर मशीन असले तर झाली पंचाईत मग, देवा. अहो हो, आम्ही मशीन ना देखील आजकाल शिकवतो ना आवाज ओळखायला. स्पेशिअली जर पैसे काढण्याचं मशीन आवाजावर चालणार असेल तर? म्हणजे पैसे काढणे - घालणे जर आवाज / बोलून कमांड देऊन घडणाऱ्या असतील तर? पंचाईत घसा खरखर झाली कि. असो.

मला माणसांचे आणि काही जनावरांचे नेहेमीचे आवाज माहित आहेत. पण जेव्हा आवाज बदलतो तेव्हा ताबडतोब लक्षात येतो, ह्याला दोन कारणं आहेत, एक म्हणजे तो व्यक्ती एक तर अगदी हळू बोलतो नाहीतर बोलतच नाही. पण जर तो मोठ्या मोठ्याने बोलायला लागला त्याच्या भसाड्या बदललेल्या आवाजात तर? 

अहो, मी परवा उडालेच, जबरदस्त विलक्षण अनुभव होता. बिच्चारा मोठ्या मोठ्याने बदलेल्या आवाजात भुंकत होता. बिच्चारा, खरंच, ऐकून पोटात गोळा आला. त्याला आता कोण औषध देणार? अर्थात त्याला औषधाची गरज पण नाही ते फटाफट तसेच ठीक होतात. पण कशा करता तो भुंकत होता कोणास ठाऊक?  काहीतरी तळलेलं खाल्लं असेल, जे नको खायला, वेडा कुठला. पण मी हे माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं त्यामुळे मला वाईट वाटलं कारण मी काहीच करू शकले नाही त्या करता. असो, लवकर बरा हो बाबा आणि तो वर भुंकू नको.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...