शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

शुक्रवार आणि पैसे

हि एक अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मी वसतिगृहात राहत होते तेव्हा. त्या वेळी सगळे व्यवहार पैशाने (नोटा - हार्डकॉपि ऑफलाईन) होत असत कारण त्यावेळी तंत्रज्ञान इतकं विकसित झालं नव्हतंच. असो. त्या वसतिगृहात सगळ्याच तेलगु मुली होत्या, मी एकटीच वेगळी. त्या काळी आणि त्या देशाच्या भागात वेगळे नियम होतेच आणि त्याचा परिणाम माझ्यावर न कळत झाला आणि तो बरीच वर्ष टिकला देखील.

मला वसतिगृहाचे महिन्याचे पैसे द्यायचे होते आणि माझ्या सरळ स्वभावामुळे मी बरोबर एक तारखेला देत असे. एका महिन्यात एक तारीख शुक्रवारी आली. मी पैसे / नोटा दिल्या दिल्या बहुतांशी सगळ्याच माझ्यावर ओरडल्याच / खेकसल्या. "असे शुक्रवारी पैसे द्यायचे नसतात, शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस. तिला सांभाळून ठेवायचं, असं देऊन टाकायचं नाही" ई. मी घाबरले थोडीशी आणि त्यानंतर कित्येक वर्ष मी प्रत्येक वेळी कोणालाही पैसे देतांना पहिल्यांदा आणि चारदा चाचपडून बघत असे कि आज शुक्रवार तर नाही?

मग काही वर्षांनी सगळेच व्यवहार नोटेविना व्हायला सुरवात झाले ऑनलाईन. उदाहरणार्थ पगार. एखाद्या कंपनीत किंवा ऑफिस मधे सगळ्या लोकांना पगार द्यायचा म्हणजे फक्त एक चेक तय्यार होतो. त्यावर असंख्य वरिष्ठांच्या सह्या होतात आणि मग तो बँकेत टाकला जातो. त्या बँकेच्या पद्धती प्रमाणे मग प्रत्येकाचा वाटा त्या त्या एम्प्लॉई ला मिळतो / त्याच्या बँकेत खात्यात जमा होतो. प्रत्येक वेगवेगळ्या बँकेचे आपआपले नियम आणि अटी. त्यामुळे ह्या साखळीला लागणार तेवढा वेळ लागतोच दर महिन्याला. मग आता सांगा "शुक्रवारी कोणालाही पैसे द्यायचे नाही" हा नियम जर संस्था आणि वेगवेगळे ऑफिस पाळायला लागले तर ते काय बघणार, शुक्रवार हा त्यांनी=ऑफिस वाल्यांनी जेव्हा चेक काढला त्या दिवशी तर नव्हता? का चेक जमा झाला त्या दिवशी? का तो एम्प्लॉईला मिळाला त्या दिवशी? का असा एक अल्गोरिदम मधला भाग ठेवायचा कि "शुक्रवार असेल तर पैसे द्यायचे / ट्रान्सफर करायचे नाहीत"? असं होणं शक्यच नाही, बरोबर?

त्यामुळे आज जेव्हा पहाटे विचार माझ्या मनात आला सॅलरी चा SMS वाचल्यावर तेव्हा पासून मी सगळ्या सगळ्यांची मनापासून माफी मागते ज्यांना ज्यांना मी शुक्रवारी पैसे दिले नाहीत किंवा असा वेड्यासारखा विचार केला अनेकदा. त्या माझ्या छोट्याश्या मेंदूला पण अनेकदा प्रचंड त्रास दिल्यामुळे त्याची पण माफी मागते. अपेक्षा आहे कि सगळे मला ह्या शुक्रवारच्या माझ्या वेड्या सारख्या विचार आणि आचाराबद्दल नक्की माफ करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...